सिनेविश्वातील एका जोडप्याने आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर व सलमान खानचा मित्र मुदस्सर खान बाबा झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. मुदस्सरची पत्नी रिया किशनचंदानीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. लग्नानंतर वर्षभराने या जोडप्याच्या आयुष्यात एका चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खानने ३ डिसेंबर २०२३ रोजी गर्लफ्रेंड रिया किशनचंदानीशी आंतरधर्मीय लग्न केले होते. आता वर्षभराने हे दोघे आई-बाबा झाले आहेत. रियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुदस्सरने आज (२३ डिसेंबरला) एक व्हिडीओ शेअर केला आहे. “सर्व प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी मी आम्हा दोघांचे कुटुंब आणि मित्रांचे आभार मानतो,” असं कॅप्शन देऊन मुदस्सरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने लेकीच्या जन्माची माहिती दिली. मुदस्सरने डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत.

हेही वाचा – लग्नानंतर ४ वर्षांनी सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी मुलाचा जन्म, व्हिडीओ शेअर करून दिली Good News

मुदस्सरच्या पोस्टवर चाहते व मित्र-मैत्रिणी कमेंट करून त्याचं व रियाचं अभिनंदन करत आहेत. चाहत्यांनीही त्याच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा – Video: हल्ला झाल्यानंतर पत्नी, मुलांना घेऊन अल्लू अर्जुनने सोडलं घर; त्याचे वडील म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडलं ते…”

सलमान खानचा खास मित्र आहे मुदस्सर खान

मुदस्सर खान सलमान खानचा खास मित्र आहे. मुदस्सर व रियाच्या लग्नाला सलमानने हजेरी लावली होती. मुदस्सर खानला ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमधून ओळख मिळाली. या रिअॅलिटी शोचे अनेक सीझन त्याने जज केले होते. रिअॅलिटी शो व्यतिरिक्त मुदस्सर खानने अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शनही केले आहे. या कोरिओग्राफरचे सलमान खानशी खास कनेक्शन आहे. मुदस्सरने सलमान खानच्या ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘राधे’ आणि ‘अंतिम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

हेही वाचा – खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो

कोण आहे रिया किशनचंदानी?

रिया किशनचंदानी ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘मिका दी वोटी’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकली होती. रिया एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ‘मैं होना की नहीं होना’, ‘स्वॅग दी सवारी’ आणि ‘तेनू दस्या’ यांसारख्या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan friend bollywood choreographer mudassar khan riya kishanchandani welcome baby girl see video hrc