Salman Khan gets Threat: काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई टोळीकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी सातत्याने मिळत आहे. आजही मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका संदेशाद्वारे सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत वरळी पोलीस गुन्हा दाखल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागच्या काही दिवसांत सलमान खानला बिश्नोई टोळीकडून तीन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तर याच आठवड्यातील ही दुसरी धमकी आहे. धमकी देणाऱ्याने स्वतःला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री धमकीचा हा संदेश आला असून त्यात लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. संदेश पाठविणाऱ्याने स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचे म्हटले आहे. “सलमान खानला जर जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी आणि पाच कोटी रुपये द्यावेत. जर त्याने असे केले नाही, तर आम्ही जिवंत सोडणार नाही. आमची टोळी अजूनही सक्रिय आहे”, अशा आशयाचा संदेश वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.
हे वाचा >> Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिष्णोई सलमान खानच्या मागे हात धुवून का लागलाय? वाचा २६ वर्षांचा घटनाक्रम
याआधीच्या दोन धमक्या कधी आल्या?
मुंबई पोलिसांकडून सध्या या संदेशाचा स्त्रोत शोधला जात आहे. तसेच सलमान खानला दिलेल्या सुरक्षेचाही आढावा घेण्यात येत आहे. तसेच हा संदेश खरंच बिश्नोई टोळीच्या सदस्याने पाठविला आहे की, मागच्यावेळेसप्रमाणे कुणी खोडसाळपणा केला आहे. मागच्या आठवड्यात ३० ऑक्टोबर रोजी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षालाही अशाचप्रकारे धमकी देणारा संदेश पाठविण्यात आला होता. तेव्हाही दोन कोटींची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. तेव्हा धमकी देणारी व्यक्ती वांद्रे पश्चिमेकडील जामा मस्जिदीजवळ असल्याचे कळताच तेथे जाऊन पोलिसांनी आजम मोहम्मद मुस्तफा याला पकडले होते. पोलीस चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
हे ही वाचा >> BlackBuck and Bishnoi Community: ‘काळवीट’ बिश्नोई समाजासाठी पवित्र का आहे? सलमान खान आणि काळवीट प्रकरण काय?
या आधीही सलमानला अशा प्रकारे धमकी देण्यात आली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमकीचा संदेश आला होता. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय भाजी विक्रेत्याला वरळी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचला होता व वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एक संदेश पाठवून आरोपीने माफीही मागितली होती. तसेच, आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातही धमकी देणाऱ्याला नुकतीच अटक करण्यात आली. आरोपीने झिशान सिद्दीकी यांच्यासोबत सलमानलाही धमकावले होते.