बॉलीवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत होता. परंतु, सध्या सलमान खानने ३५ वर्षांपूर्वी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘मैंने प्यार किया’ चित्रपटाच्या यशानंतर भाईजानने हे पत्र त्याच्या समस्त चाहत्यांना लिहिलं होतं. तसंच अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी स्वीकारल्याबद्दल सलमानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले होते. सलमानचं हे पत्र मूळ स्वरुपात सिने ब्लिट्ज मासिकात प्रसिद्ध झालं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमान खानने त्याच्या पत्रात नेमकं काय लिहिलं होतं याची उत्सुकता अनेकांना आहे. अभिनेत्याने त्याच्या लाखो प्रेक्षकांचे कसे आभार मानले जाणून घेऊयात…

सलमान लिहतो, “मला आज तुम्हा सर्वांना माझ्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे. सर्वप्रथम, एक अभिनेता म्हणून मला स्वीकारल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार…मी माझ्या प्रत्येक चित्रपटात तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. सध्या प्रत्येक चित्रपटाची निवड करण्यापूर्वी मी भरपूर विचार करत आहे. माझ्या विवेकबुद्धीनुसार मी चांगल्या कथांवर लक्ष केंद्रित करत आहे. कारण, मला माहित आहे की, यानंतर मी जे काही चित्रपट करेन त्याची तुलना ‘मैंने प्यार किया’शी होणार आहे. त्यामुळे भविष्यात मी जेव्हा पण चित्रपटाची घोषणा करेन तेव्हा खात्री बाळगा की, तो एक चांगला चित्रपट असेल आणि मी त्यासाठी माझे शंभर टक्के देईन.”

हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळेचा स्विमिंग पूलमधला फोटो पाहून चाहते म्हणतात, “आईसाहेब मारतील…”

सलमान पुढे लिहितो, “मी तुम्हा सर्वांवर प्रचंड प्रेम करतो आणि आशा करतो की तुम्ही सुद्धा माझ्यावर तसंच प्रेम करत राहाल. कारण, ज्यादिवशी तुम्ही माझ्यावर प्रेम करणं बंद कराल, माझे चित्रपट पाहणं थांबवाल तोच माझ्या करिअरचा शेवटचा दिवस असेल. कारण तुमच्यासारखे लोक आमच्यासारख्या लोकांना स्टार बनवतात हे कायम लक्षात ठेवा.”

हेही वाचा : “स्वतःची काळजी घ्या, तब्येत जपा”, हेमंत ढोमेची शरद पवारांसाठी भावुक पोस्ट; म्हणाला, “साहेब…”

‘मैंने प्यार किया’ चित्रपटातून सलमान खानने सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४ कोटींची कमाई केली होती. या आकडा त्यावेळी खूप मोठा होता. पुढे, सलमानने सूरज बडजात्या यांच्याबरोबर ‘हम आपके है कौन’ आणि ‘हम साथ साथ हैं’ मोठे सिनेमे केले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. सलमान खानचा चित्रपटसृष्टीत हळहळू दबदबा निर्माण झाला. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘सिकंदर’ चित्रपटावर काम करत आहे. एआर मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’ पुढच्या वर्षी ईदला म्हणजेच २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमान ‘द बुल’मध्येही झळकणार आहे.