सलमान खानसुद्धा एका मोठ्या काळानंतर बॉक्स ऑफिसवर कमबॅक करण्यास सज्ज आहे. २०१९ साली ‘दबंग ३’मध्ये सलमान दिसला. नंतर २०२१ मध्ये ‘अंतिम’मध्ये सलमान होता पण त्यात त्याची मुख्य भूमिका नव्हती. आता तब्बल ३ वर्षांनी सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सलमानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर लोकांच्या पसंतीस पडला आहे तर गाणीदेखील सुपरहीट आहेत.

सलमानच्या या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. अशातच सलमानच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर समोर आली आहे ती म्हणजे भाईजान हा आता लवकरच करण जोहरबरोबर चित्रपट करणार आहे, इतकंच नव्हे तर हा चित्रपट पुढच्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी चर्चा आहे.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?

आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र’चे पुढील भाग बनणार नाहीत? करण जोहर आणि डिज्नी स्टुडिओजने निर्मितीतून घेतला काढता पाय

‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार लवकरच सलमान खान करण जोहरबरोबर एक चित्रपट घेऊन येणार आहे. ‘वॉन्टेड’पासूनच सलमानसाठी ईद लकी ठरली आहे तर यंदाच्या वर्षाप्रमाणेच सलमान २०२४ च्या ईदसाठी आत्तापासूनच प्लान करत आहे. सलमान सध्या त्याच्या ज्या आगामी स्क्रिप्टवर विचार करत आहे त्यापैकी एक स्क्रिप्ट ही धर्मा प्रोडक्शनची आहे. सलमान आणि करण जोहर एकत्र येऊन एक बिग बजेट चित्रपट घेऊन येणार असल्याचं म्हंटलं जात आहे.

जर सलमान खानने करण जोहरच्या या चित्रपटाला हिरवा कंदील दिला तर तब्बल २५ वर्षांनी ही जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. २५ वर्षांपूर्वी करण जोहरचा पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’मध्ये सलमान दिसला होता, अर्थात त्यात सलमान मुख्य भूमिकेत नसला तरी त्याची खूप महत्त्वाची भूमिका होती. सध्यातरी याबाबतीत कोणताच अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. जर सलमान हा चित्रपट करणार असेल तर करण जोहर स्वतः त्याचं दिग्दर्शनही करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा : दलाई लामांच्या ‘त्या’ वादग्रस्त व्हिडिओवर सोफिया हयातची प्रतिक्रिया; मॉडेल म्हणाली, “त्यांचा हेतू…”

सध्या करण जोहर त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे. शिवाय सलमान खानचे यावर्षी २ चित्रपट येणार आहेत. त्यापैकी ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या ईदलाच प्रदर्शित होणार आहे तर ‘टायगर ३’सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सलमानबरोबर कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि शाहरुख खानचा एक कॅमिओदेखील बघायला मिळणार आहे.

Story img Loader