सलमान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर ३ १० नोव्हेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता ‘टायगर ३’ चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात; सकाळी लवकरच्या शोबद्दल नवी माहिती समोर

‘यशराज फिल्म्स’ने आपल्या यूट्युब चॅनेलवर ‘टायगर ३’चा धमाकेदार नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये सलमान, कतरिनाबरोबर इमरान हाश्मीचा अॅक्शन लूक बघायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या काही वेळातच हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला आजपासून (५ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. टायगर ३ चा पहिला शो सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाल्याच्या काही वेळातच चित्रपटाने १ कोटींचा टप्पा पार केला आहे. भारताबरोबर UK, UAE व USA मध्येही टायगर ३ ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा- बॉलीवूडमध्ये पदापर्णानंतर राज कुंद्राला करायचंय ‘या’ अभिनेत्रीबरोबर काम; खुलासा करत म्हणाला…

‘टायगर ३’बद्दल बोलायचं झालं तर ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला हा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबरच इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. मनीष शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदीबरोबरच तामिळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan katrina kaif starrer most awaited film tiger 3 new promo out dpj