सलमान खानच्या बहुचर्चित ‘टायगर ३’ ची कथा लीक झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अचानक चित्रपटाचे कथानक IMDB या साईटवर लीक झाल्याचं समोर आलं आहे . सलमानच्या चाहत्यांनीच ही बाब लक्षात आणून दिली आहे. IMDb सहसा चित्रपटाची योग्य माहिती देते. पण हे कथानक योग्य आहे की नाही, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. ‘टायगर ३’ मध्ये ‘एक था टायगरच्या’ आधीची गोष्ट सांगितली जाणार असल्याचा अंदाज त्यावरून लावला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एक था टायगर’मध्ये कतरिना कैफने झोया या आयएसआयच्या गुप्तहेराचे पात्र साकारले आहे. याच झोयाच्या भूतकाळातील एक व्यक्ति तिचा बदला घ्यायला या तिसऱ्या भागात समोर येणार असल्याचं स्पष्ट होत आहे आणि याच नव्या मिशनवर टायगर आणि झोया एकत्र काम करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. झोयाच्या भूतकाळातील त्या व्यक्तीची भूमिका अभिनेता इमरान हाश्मी करणार आहे असंही IMDb वर लीक झालेल्या कथेतून स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा : अभिनयातून ब्रेक घेतल्याने समांथा रूथ प्रभूचे ‘इतक्या’ कोटींचे नुकसान; अभिनेत्रीने केले निर्मात्यांना पैसे परत

‘टायगर ३’मध्ये आता इमरान आणि सलमान एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सोशल मीडियावर लीक झालेल्या या कथानकाची जबरदस्त चर्चा होत आहे. सलमानचे चाहतेही याबद्दल जोरदार चर्चा करताना दिसत आहेत. याबरोबरच चित्रपटात ‘टायगर’बरोबर ‘पठाण’ही छोट्या भूमिकेत दिसणार आहे.

‘पठाण’मध्ये शाहरुख-सलमानची कमाल पाहून ‘टायगर ३’मध्येही अशाच धमाकेदार सीन्सची त्यांचे चाहते वाट बघत आहेत. ‘टायगर ३’चं चित्रीकरण पूर्ण झालं असून त्याच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. १५ ऑगस्टपर्यंत चित्रपटाचं प्रमोशन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची फार आतुरतेने वाट बघत आहेत. १० नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan katrina kaif starrer tiger 3 plot got leaked on imdb site avn