Tiger 3 Box Office Collection Day 2: सलमान खान व कतरिना कैफ यांच्या ‘टायगर ३’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळत आहे. ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ नंतर सलमान व कतरिनाच्या स्पाय चित्रपटाचा तिसरा भाग दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झाला. रविवारी १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी जोरदार कमाई केली, त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे.
‘टायगर ३’ ची दणक्यात सुरुवात, सलमान-कतरिनाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले ‘तब्बल इतके कोटी
‘टायगर ३’ ने पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई दुसऱ्या दिवशी केली आहे. विक डे म्हणजेच सोमवार असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा गाठला आहे. टायगर ३ हा सलमान खानचा सर्वाधिक ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाचं कलेक्शन बघता शाहरुख खाननंतर आता सलमाननेही दमदार कमबॅक केलं आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
रिलीजच्या पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची बंपर कमाई केल्यानंतर आता ‘टायगर ३’च्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ ने दुसऱ्या दिवशी ५७.५० कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाची अवघ्या दोन दिवसांची एकूण कमाई आता १०२ कोटी रुपये झाली आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’, ‘जवान’ तसेच ‘बाहुबली २’ सह अनेक चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.
“हे धोकादायक आहे”, चाहत्यांनी थिएटर्समध्ये फटाके फोडल्यावर सलमान खानची प्रतिक्रिया; म्हणाला…
दुसऱ्या दिवशी सलमान खानच्या चित्रपटाने सर्वाधिक ५० कोटींहून अधिक कमाई केली. ‘बाहुबली २’ ने दुसऱ्या दिवशी ४०.२५ कोटी, ‘गदर’ने ३८.७ कोटी, ‘टायगर जिंदा है’ ३६.५४ कोटी, ‘जवान’ ३०.५ कोटी, ‘केजीएफ चॅप्टर २’ २५.५७ कोटी, ‘पठाण’ २५.५ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘टायगर ३’ ने दुसऱ्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत या सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे.