Tiger 3 Box Office Collection Day 3: सलमान खानचा ‘टायगर ३’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. दिवाळीच्या दिवशी रिलीज झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षक गर्दी करत आहेत. प्रेक्षकांना हा चित्रपट भावला आहे. सलमान खान व कतरिना कैफ यांच्या स्पाय सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. यापूर्वी या फ्रेंचायजीचे ‘एक था टायगर’ व ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट आले होते. आधीच्या दोन्ही चित्रपटांप्रमाणेच तिसरा भागही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
‘टायगर ३’ चा जलवा! दुसऱ्या दिवशी केली जबरदस्त कमाई; ‘पठाण’, ‘जवान’सह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
‘टायगर ३’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ४४.५० कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर या चित्रपटाची विक डे असूनही सोमवारी घोडदौड कायम राहिली. ‘सॅकनिल्क’च्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ ने दुसऱ्या दिवशी ५७.५० कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत १०२ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आणि शाहरुख खानच्या ‘पठाण’, ‘जवान’ तसेच ‘बाहुबली २’ सह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. त्यानंतर आता चित्रपटाची तिसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे.
‘टायगर ३’ ने पहिल्या व दुसऱ्या दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी कमी कमाई केली आहे, पण कमाईचा आकडा निश्चितच चांगला आहे. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ ने तिसऱ्या दिवशी ४२.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह, चित्रपटाचे तीन दिवसांचे एकूण कलेक्शन आता १४६ कोटी रुपये झाले आहे.
‘टायगर ३’ ची दणक्यात सुरुवात, सलमान-कतरिनाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले ‘तब्बल इतके कोटी
या चित्रपटात सलमान खान टायगर (अविनाश सिंह राठोड) तर कतरिना कैफ जोयाच्या भूमिकेत आहे. याशिवाय सिनेमात इमरान हाश्मीने खलनायकाची भूमिका केली आहे. यामध्ये शाहरुख खान व हृतिक रोशनने कॅमिओ केला आहे. तीन दिवसांत फक्त भारतात जवळपास १५० कोटी कमावणारा हा चित्रपट हा संपूर्ण आठवडा अशीच दमदार कमाई करत राहिला तर तो अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल, अशी शक्यता आहे.