बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाचा टीझर जानेवारी महिन्यात ‘पठाण’बरोबर प्रदर्शित झाला होता. टीझरनंतर चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. याच्या ट्रेलरची सगळेच आतुरतेने वाट पहात होते. अखेर ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खानच्या अँक्शन सीन्सचा थरार पाहायला मिळत आहे. सलमान खान व पूजा हेगडेच्या केमिस्ट्रीची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. याबरोबरच भाईजानचा रोमँटिक अंदाजही पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सलमान खान दाक्षिणात्य लूकमध्ये दिसत आहे. सलमान खानचा हा चित्रपट सुपरस्टार अजित कुमारच्या २०१४ च्या ‘वीरम’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. पण तुम्हाला माहितीये का की ‘दृश्यम’प्रमाणेच ‘वीरम’चेही इतर दाक्षिणात्य भाषांमध्ये आधीच रिमेक झाले आहेत.

Salman Khan And Shahrukh Khan
राकेश रोशन गाढ झोपेत असताना सलमान-शाहरूख खान त्यांच्या खोलीबाहेर गोळीबार…; दिग्दर्शक म्हणाले, “त्यांची सीमारेषा…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
lakshmi niwas jayant real face reveal
आधी झुरळ खाल्लं, आता घडणार ‘असं’ काही…; जान्हवीसमोर येतंय जयंतचं वेगळंच रुप! नेटकरी म्हणाले, “हिंदी मालिकेची कॉपी…”
Ankush Chaudhari as Police officer
अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील लूक पोस्टर रिलीज
chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
nana patekar wife neelkanti makes her acting comeback in vicky kaushal chhaava movie
Video : ‘छावा’मध्ये झळकणार नाना पाटेकरांच्या पत्नी! नव्या गाण्यात दिसली पहिली झलक, नीलकांती पाटेकर कोणती भूमिका साकारणार?
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”

आणखी वाचा : “रणबीर कपूर गेला खड्ड्यात” अभिनेत्याबद्दल केलेल्या या वक्तव्यावर उर्फी जावेदचे स्पष्टीकरण; म्हणाली “मी असं…”

‘किसी का भाई किसी की जान’ हा ‘वीरम’ या चित्रपटाचा तिसरा अधिकृत रिमेक आहे. याआधी २०१७ मध्ये सुपरस्टार पवन कल्याण यांनी तेलुगूमध्ये ‘कटमर्यादू’ हा चित्रपट काढला जो ‘वीरम’चा रिमेक आहे. यानंतर २०१९ मध्ये ‘ओडेया’ हा कन्नड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला जोसुद्धा अजित कुमारच्या चित्रपटाचा रिमेक आहे. आता सलमान खान हिंदीमध्ये याचा रिमेक ‘किसी का भाई किसी की जान’ या नावाने घेऊन येत आहे.

‘वीरम’चे तेलुगू आणि कन्नड रिमेक हे यूट्यूबवर उपलब्ध आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात सलमान खानसह दग्गुबती व्यंकटेश, पूजा हेगडे, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. तर सलमान खान हा स्वत: या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ईदच्या मुहुर्तावर येत्या २१ एप्रिलला ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader