Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 7 : सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू फिकी पडली आहे. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. वीकेंडला चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या कमाईचा वेग दिवसेंदिवस चांगलाच मंदावत आहे. चित्रपटाला सातव्या दिवशी खूपच कमी गल्ला जमवता आला आहे. आठवडाभरानंतरही चित्रपटाला अद्याप १०० कोटींचा आकडा गाठता आला नाही.

हेही वाचा- “ते महान असतील पण मी…”; जेव्हा ऑन कॅमेरा शाहरुख खानने अमिताभ बच्चन यांच्याबद्दल केले होते मोठे वक्तव्य

rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Kanguva Box office collection Day 1
Kanguva: ३५० कोटींचे बजेट असलेल्या ‘कंगुवा’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
table no 21 joker blind psycholigical thrillers on ott
‘मर्डर २’ पाहिलाय? त्याहूनही भयानक आहेत जिओ सिनेमावरील ‘हे’ सायकॉलिजल थ्रिलर चित्रपट; पाहा यादी
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Elderly Man Narrowly Escapes Death Before Vande Bharat Swooshes By shocking video
VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? रुळ ओलांडताना वंदे भारत एक्सप्रेस आली अन् एका निर्णयानं आजोबा असे बचावले

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘किसी का भाई किसी की जान’ ने गुरुवारी रिलीजच्या सातव्या दिवशी फक्त ३.५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता ९०.१५ कोटींवर गेली आहे. या चित्रपटाने सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी फक्त पाच कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला तरी सलमानच्या चित्रपटाला १०० कोटींचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे सलमानची बॉक्स ऑफिसवरील जादू फिकी पडल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- Jiah Khan Suicide Case : १० वर्षांनी जिया खान प्रकरणात कोर्ट देणार निकाल, सूरज पांचोली सुनावणीसाठी हजर

जगभरात चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. मात्र, चित्रपटाच्या कमाईतील घसरण पाहता पहिल्या आठवड्यात चित्रपट देशभरात १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होईल, अशी चिन्हे दिसत नाहीयेत. कमाईत सातत्याने घसरण होत आहे, वीकेंडला कदाचित आकड्यांमध्ये थोडी सुधारणा दिसू शकेल, असे अंदाज वर्तवले जात आहेत. सलमान खानसह पूजा हेगडे, जस्सी गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, शहनाज गिल, विनाली भटनागर तसेच दाक्षिणात्य कलाकारांच्या भूमिका असल्या तरी हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.