Salman Khan Meet Zeeshan Siddique : बॉलीवूडचा भाईजान म्हणून सलमान खानला ओळखले जाते. अभिनयाबरोबरच स्वभावामुळे त्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकता सलमान ‘दबंग’ टूर – रिलोडेड कार्यक्रमासाठी दुबईला रवाना झाला. त्यावेळी सलमान खान दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांच्याबरोबर दिसला. विमानतळावर या दोघांची भेट झाली. भेटीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमान खान दुबईला रवाना

सलमान खान झिशान सिद्दिकींबरोबर दुबईला रवाना झाला आहे. विमानतळावर आल्यानंतर या दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर झिशान सिद्दिकी विमानतळावरून आतमध्ये जाताना सलमान खान त्यांच्यासाठी असलेली काळजी व्यक्त करताना दिसला. झिशान आतमध्ये जात नाहीत तोपर्यंत सलमान सतत मागे वळून खात्री करत होता.

हेही वाचा : वादळवाट’ फेम अभिनेत्री आहे आमदार उदय सामंत यांची पत्नी; राजकारणाबद्दल म्हणाली, “बायको म्हणून जो खंबीर आधार…”

या प्रवासादरम्यान सलमान खानने काळ्या रंगाचा शर्ट आणि पँट परिधान केली होती. तसेच काळ्या रंगाची एक टोपीसुद्धा सलमानने परिधान केली होती. तर, झिशान सिद्दीकी यांनी यावेळी सफेद टी-शर्ट आणि काळी पँट परिधान केली होती.

दुबईतील भव्य कार्यक्रमात ‘हे’ कलाकारही लावणार हजेरी

सलमान खान ७ डिसेंबरला ‘दबंग’ द टूर रिलोडेडमध्ये उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात त्याच्याबरोबर सोनाक्षी सिन्हा, जॅकलीन फर्नांडिस, प्रभू देवा, मनीष पॉल, दिशा पटानी, तमन्ना भाटिया, सुनील ग्रोवर व आस्था गिल यांचीही उपस्थिती असणार आहे. सलमानने काही दिवसांपूर्वीच त्याच्या एक्स अकाउंटवर या कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते, “दुबईमध्ये ७ डिसेंबर २०२४ ला होणाऱ्या ‘दबंग’ द टूर कार्यक्रमासाठी सज्ज व्हा.” असं लिहीत त्याने वरील सर्व कलाकारांना टॅग केले होते.

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी

काल महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. मुंबईतील आझाद मैदान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक दिग्गज आणि मान्यवरांसह कलाकारांनीही हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सलमान खानसुद्धा आला होता.

हेही वाचा : Video: “आई ही माझी बेस्ट फ्रेंड…” स्वप्नील जोशीने आईच्या ७४व्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “माझं आयुष्य…”

दरम्यान, सलमानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच तो ‘सिकंदर’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. त्यामध्ये सलमान खान दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.