बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (२१ डिसेंबर रोजी) पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला बॉलीवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली. महानायक अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, शाहरुख खान, काजोल, सोनून निगम, सलमान खान हे देखील या सेलिब्रेशन सोहळ्याला उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या व्हिडीओंपैकी एका व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हा व्हिडीओ अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व सलमान खान यांचा आहे. हे तिघेही एकाच वेळी मंचावर हजर असतात. तिथे सोनू निगमही असतो. विरल भयानी व वरिंदर चावला या पापाराझी अकाउंट्सवर त्यांचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

आई अन् आजी सुपरस्टार, अभिनेत्याबरोबरच्या एका MMS ने संपवलं ‘या’ अभिनेत्रीचं करिअर; आता काय करते? वाचा

सोनू निगम सलमान खानला मंचावर बोलावतो, सलमान जातो आणि उपस्थित असलेल्या करण जोहरची गळाभेट घेतो. तिथेच अमिताभ बच्चन उभे असतात, त्यांचीही सलमान गळाभेट घेतो. नंतर सलमान जवळच उभ्या असलेल्या अभिषेकची गळाभेट घेतो. यावेळी अभिषेक सलमानची पाठ थोपटतो. आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहेत.

१३ व्या वर्षी घरातून पळाले, मुंबईत येऊन बनले गुंड; रस्त्यावर भांडत होते अन्…, अजय देवगणने सांगितली वडिलांच्या संघर्षाची कहाणी

एकेकाळी सलमान खान व ऐश्वर्या रायचं अफेअर होतं. ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आता १६ वर्ष झाले आहेत. खरं तर अभिषेक व सलमान बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात, त्यावेळीही त्यांची भेट होते. यापूर्वीही त्यांचे एकाच कार्यक्रमातील फोटो चाहत्यांना पाहायला मिळाले होते. पण आनंद पंडित यांच्या वाढदिवसात भर मंचावर सलमानने खूप आदर व प्रेमाने अमिताभ बच्चन व अभिषेक यांची गळाभेट घेतली, हे पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan met amitabh bachchan and abhishek bachchan at anand pandit birthday video viral khan hrc