बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने त्याची आई सलमा खान यांच्या वाढदिवसाचा एक खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. सलमानने एका व्हिडीओच्या माध्यमातून सलमा खान आणि सोहेल खान यांच्या नृत्याचा आनंददायक क्षण ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केला आहे.
वाढदिवसाच्या पार्टीतील खास नृत्य
व्हिडीओमध्ये सलमा खान फुलांच्या प्रिंटचा पोशाख घालून अतिशय आकर्षक दिसत आहेत, तर सोहेल खानने पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट, डेनिम्स आणि कॅप घातली आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही संगीताच्या तालावर ठेका धरत नृत्य करताना दिसतात. व्हिडीओच्या दरम्यान, सोहेलने कॅमेऱ्यामागे असलेल्या व्यक्तीशी हसत हसत संवाद साधला आणि म्हणाला, “मी त्यांच्या स्टेप्सशी जुळवून घेईन.”
हेही वाचा…लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
नृत्यानंतर सलमा आपल्या मुलाला (सोहेल खानला) मिठी मारताना दिसतात. हा व्हिडीओ शेअर करत सलमानने लिहिले, “मम्मी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… मदर इंडिया, आमच संपूर्ण जग!” सलमानने या पोस्टमध्ये सोहेल, अरबाज खान, अल्विरा खान अग्निहोत्री आणि अर्पिता खान यांनाही टॅग केले. सोहेलने देखील हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, “हॅपी बर्थडे मदर इंडिया.”
Mummmmmyyyyy happy birthday… mother India, our world@SohailKhan @arbaazSkhan #AlviraKhanAgnihotri #ArpitaKhanSharma pic.twitter.com/bweEXkSvw7
— Salman Khan (@BeingSalmanKhan) December 9, 2024
कुटुंबाबरोबर वाढदिवसाचा आनंद
सलीम खान यांच्या पत्नी सलमा खान यांनी अलीकडेच मुंबईत कुटुंबिय आणि मित्रांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. हा खास सोहळा अर्पिता खानच्या नव्याने सुरू केलेल्या रेस्टॉरंटमध्ये आयोजित करण्यात आला होता.
सलमा आणि हेलन यांचे नृत्य
फिटनेस कोच डिन पांडे यांनी देखील या पार्टीतील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले. एका व्हिडीओमध्ये सलमा खान या मोठा केक कापताना दिसतात, त्यांच्या मुली अर्पिता, अल्विरा आणि इतर कुटुंबीय त्यांच्या बाजूला उभे आहेत. सलीम खान यांच्या दुसऱ्या पत्नी हेलन देखील या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी सलमा खान यांच्याबरोबर नृत्य केले. फिटनेस कोच डिन पांडे यांनी पोस्ट शेअर करत लिहिले, “हॅपी बर्थडे सलमा आंटी. तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात,आम्ही आज खूप मजा केली.”
हेही वाचा…Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ मधल्या ‘या’ आडनावावरुन करणी सेना आक्रमक, निर्मात्यांना थेट घरात घुसून मारण्याचा इशारासलीम खान यांनी सलमा यांच्याशी १९६४ साली लग्न केले. १९८१ साली सलीम खान यांनी हेलन यांच्याशी दुसरे लग्न केले. अलीकडेच सोहेलने कुटुंबाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये सलमा खान, सलीम खान, सलमान खान, अरबाज खान, अर्पिता खान शर्मा आणि अल्विरा खान अग्निहोत्री होते.