बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. ‘टायगर ३’मध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबर कतरिनाचाही अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे. आता चित्रपटाच्या पहिल्या शोबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- Video: भीषण कार अपघातानंतर पहिल्यांदाच गायत्री जोशी आली समोर; पतीसह एका कार्यक्रमात झाली होती सहभागी

Paaru
Video: पारू-आदित्यमधील जवळीक वाढणार, अनुष्का दोघांची अहिल्याकडे तक्रार करणार, पाहा प्रोमो
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Chief Minister Devendra Fadnavis announces that Naxalism will be contained within three years Nagpur news
नक्षलवाद तीन वर्षांत आटोक्यात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Vanvaas 1 Days Box Office Collection
‘वनवास’ची निराशाजनक सुरुवात, नाना पाटेकरांच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख
Shiva
Video: “या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच…”, अखेर शिवा व आशू एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार; मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Pushpa 2 OTT Release Update
‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर Pushpa 2 होणार प्रदर्शित, तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला करार
pataal lok seson 2 new promo
Video : “मौसम बदलने वाला है…”; ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला प्रेक्षकांच्या भेटीला, हाथीराम चौधरीच्या मानेवरील ‘ती’ तारीख पाहून नेटकरी म्हणाले…

सेलिब्रिटी फोटोग्राफर तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा पहिला शो आणि अॅडव्हान्स बुकिंगबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ‘टायगर ३’चा पहिला शो सकाळी ७ वाजता प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची तारीख जाहीर करण्यात आली होती. ५ नोव्हेंबर २०२३ पासून ‘टायगर ३’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू होणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘टायगर ३’चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. UK, UAE व USA मध्ये ‘टायगर ३’च्या अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. निर्माते ११ नोव्हेंबरला यूएसए आणि कॅनडामध्ये ‘टायगर ३’ प्रदर्शित करण्याचा विचार करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा- सनी देओलची पत्नी पूजा देओल लाईमलाईटपासून लांब का राहते? करण जोहरच्या शोमध्ये अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

‘टायगर ३’ हा ‘यशराज फिल्म्स’च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान, कतरिनाबरोबर इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरानने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट १० नोव्हेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार असून, तो हिंदीबरोबर तमीळ व तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader