बॉलीवूडचा भाईजान सलमान खान नेहमी चर्चेत असतो. जगभरात सलमानचे लाखो चाहते आहेत. सलमान सोशल मीडियावर सक्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत माध्यमातून सलमान चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान सलमान एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. नुकतचं सलमानने एका मिस्ट्री गर्लबरोबरचा फोटो शेअर केला होता. सलमानने या फोटोत त्या मिस्ट्री गर्लचा चेहरा दाखवला नव्हता. या फोटोवरुन अनेक चर्चांना उधाण आले होते. काहींनी ती त्याची गर्लफ्रेंड असल्याचेही म्हणले आहे. आता सलमानने नवीन पोस्ट शेअर करत त्या मिस्ट्री गर्लचा खुलासा केला आहे.
इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर करताना सलमान खानने खुलासा केला आहे की ही मिस्ट्री गर्ल त्याची गर्लफ्रेंड नसून त्याची भाची अलिझेह अग्निहोत्री आहे. सलमानने नुकतेच त्याची भाची अलिझेहबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एका फोटोत अलीजेह मागून सलमान मामाला मिठी मारताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती सलमानकडे बघून हसत आहे.
हा फोटो शेअर करत सलमानने लिहिलं “प्रेम आणि काळजी जनुकांमध्ये आहे. आपण जसे आहोत तसे आहोत.” आलिझेह सलमान खानच्या क्लोदिंग ब्रँड ‘बीइंग ह्युमन’च्या महिला कलेक्शनचा चेहरा बनली आहे.
सलमानच्या कामाबाबत बोलायचं झाल तर लवकरच त्याचा ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री कतरिना कैफची मुख्य भूमिका आहे. तर अलिजेह ‘फर्रे’ चित्रपटात बॉलीवूडमध्ये पदापर्ण करणार आहे. २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.