बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला वाय प्लस सुरक्षादेखील प्रदान करण्यात आली आहे. त्यानंतर आता सलमान खानने त्याच्या सुरक्षेसाठी एक महागडी बुलेटप्रूफ कार खरेदी केली होती. या कारच्या किंमतीनंतर आता त्या गाडीच्या नंबर प्लेटचीही चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

सलमान खानने बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही परदेशातून आयात केली आहे. ही एक हाय एंड बुलेट-प्रूफ एसयूव्ही कार आहे. ही कार अद्याप भारतात लाँच करण्यात आलेली नाही. या कारमध्ये B6 किंवा B7 लेव्हलपर्यंतची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ही कार जागतिक स्तरावरील सुरक्षित कार्सपैकी एक आहे. बी ६ लेव्हलपर्यंतची सुरक्षा प्रदान करणाऱ्या कार्स रायफलद्वारे झाडलेल्या गोळ्यांचा देखील सामना करू शकतात.
आणखी वाचा : Video : सलमान खान भर कार्यक्रमात झाला शर्टलेस, म्हणाला “माझे सिक्स पॅक्स अ‍ॅब्स VFX द्वारे…”

Tata punch ev discount upto 70000 rupees in february due to stock clear tata offer
टाटाने केलं मार्केट जाम! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर तब्बल ७०,००० हजारांची सूट; किंमत आणि फिचर्स घ्या जाणून…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
real rickshaw puller had to pay fine after rickshaw puller put fake number on his rickshaw
खोट्या नंबर प्लेटमुळे खऱ्या रिक्षाचालकाला फटका, वाहतूक पोलिसांनी बनावट नंबर प्लेट असली वाहन घेतले ताब्यात
Google trends : KTM 390 Adventure S
KTM 390 Adventure S की Royal Enfield Himalayan 450 , कोणती बाइक आहे बेस्ट? डिझाइन, फीचर्स, इंजिन अन् किंमत, जाणून घ्या एका क्लिकवर
Second Hand Car Maintenance Tips In Marathi
Second Hand Car Tips : सेकंड हॅण्ड कारच्या खरेदीनंतर त्याची काळजी कशी घ्याल ? फक्त चमकच नाही तर ‘या’ ५ मोलाच्या गोष्टी नेहमी तपासा
Budget 2025 Prices of Electric vehicles to get cheaper
Budget 2025 : इलेक्ट्रिक वाहनांबाबत निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा! अर्थसंकल्पातील निर्णयामुळे सर्वसामान्यांना मिळणार ‘हे’ फायदे
Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
Follow the tips to look like an old car as shiny like a new car
जुनी कार नव्यासारखी चकचकीत दिसण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

या कारने आता सलमान खानच्या टोयोटा लँड क्रूझर एलसी २०० या कारची जागा घेतली आहे. या कारमध्ये सलमानने बुलेटप्रूफ काच लावून घेतली होती. सलमान खानच्या नव्या एसयूव्ही कारची नंबर प्लेट फारच खास आहे. या कारसाठी सलमान खानने २ ते ३ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याच्या या गाडीचा नंबर २७२७ असा आहे.

या नंबरच्या मागे एक खास कारण आहे. सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला होता. तो त्याचा लकी नंबर असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्याने त्याच्या नव्या गाडीला त्याचा लकी नंबर घेतला आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात लतादीदी ते बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नाव समोर, पाहा त्यांची झलक 

दरम्यान ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खानसह दग्गुबती व्यंकटेश, पूजा हेगडे, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल यांचीही झलक पाहायला मिळाली. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. शहनाज गिल, जस्सी गिल आणि पलक तिवारी यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ईदच्या मुहुर्तावर येत्या २१ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader