बॉलीवूड अभिनेता सलमान खान कायम चर्चेत असतो. सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. आठवडाभरात चित्रपटाला १०० कोटींचा गल्लाही जमवता आलेला नाही. सलमानने हल्लीच रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ मध्ये हजेर लावली होती. मुलाखतीत त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- दिवसभरात १०० सिगारेट ओढायचे शम्मी कपूर; एकदा मॉरिशसला गेले अन्…

सलमानला बॉलीवूडचा गॉडफादर म्हणून ओळखले जाते. आत्तापर्यंत सलमानने अनेकांना बॉलीवूडमध्ये संधी दिली. मात्र, अनेक कलाकारांचे करिअर संपवल्याचा आरोपही सलमानवर करण्यात आला होता. या आरोपांवर सलमानने स्पष्टीकरण दिले आहे. सलमान खान म्हणाला, ‘मी बॉलीवूडमध्ये फार कमी लोकांच्या संपर्कात आहे. जेव्हा मी कोणसोबत काम करतो, तेव्हाच त्या व्यक्तीसोबत माझं बोलणं होतं. मी प्रत्येक वेळी पार्टीदेखील करत नाही. इंडस्ट्रीमध्ये माझे जे मित्र आहेत, ते वरिष्ठ आहे आणि काही माझे लहानपणीचे मित्र आहेत… कोणासोबत वाद घालण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही,’ असे सलमान म्हणाला.

हेही वाचा- ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाबद्दल अनुपम खेर यांनी आमिरची केली कानउघडणी; म्हणाले “सत्य स्वीकारायला…”

सलमान पुढे म्हणाला, ‘असे काही लोक आहेत, जे नशेमध्ये काहीही बोलतात, मी तुला सोडणार नाही आणि बरंच काही. पण मी जेव्हा दारू पितो तेव्हा म्हणतो… जाऊ दे ना… पण कधीकधी चूक सर्वांकडून होते,’ असेही सलमान म्हणाला. या मुलाखतीत सलमानने आपल्या प्रेमप्रकरणाबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझी लव्हस्टोरी माझ्यासोबत दफनभूमीत जाईल,’ असं सलमान म्हणाला. सलमानच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.