बॉलीवूडचा भाईजान सलमान खान नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपासून देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानाच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई, कल्याण, ठाणेसह १३ मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. अनेक कलाकार आपला मतदानाचा हक्क बजावत मत देताना दिसत आहेत. सलमान खानदेखील २० मे रोजी त्याचा हक्क बजावून मत देणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मतदानाच्या दिवशी अनेकजण निष्काळजीपणा करीत त्यांचे मत वाया घालवतात. अशा लोकांसाठी सलमानने त्याच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात सलमान स्वत: देशाचा सुजाण नागरिक म्हणून मतदान करणार आहे, असे त्याने सांगितलेय. तसेच सगळ्यांनी मतदान करा, असे आवाहनही त्याने जनतेला केले आहे.
सलमान खानने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर मतदानाविषयक एक पोस्ट शेअर केलीय या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सलमानने या पोस्टमध्ये लिहिले, “काहीही झालं तरी मी वर्षाचे ३६५ दिवस व्यायाम करतो आणि आता काहीही झालं तरी २० तारखेला मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुम्हाला जे काही करायचंय ते करा; पण आधी जा आणि मतदान करा. तुमच्या भारतमातेला त्रास देऊ नका. भारतमाता की जय.”
मतदान करणं हा सगळ्यांचा हक्क आहे आणि तो सामान्य नागरिकांपासून ते कलाकार बजावताना दिसत आहेत. तरीही असे काही लोक असतात; जे मतदान करण्यापासून लांब राहतात. पुढच्या पाच वर्षांचा विकास हा आपल्या एका मतावर अवलंबून असतो. म्हणून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कलाकारांपासून ते क्रिकेटर्सपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाचा वापर करीत मतदान कराच, असं सलमाननं बजावून सांगितलं आहे.
दरम्यान, सलमान खानच्या कामाबाबत सांगायचं झालं, तर सलमानचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात साऊथ स्टार रश्मिका मंदाना सलमानबरोबर पहिल्यांदा झळकणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास व सलमान या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
हेही वाचा… राखी सावंतच्या आजारपणावर आदिल खानचा संशय; म्हणाला, “कोर्टाची तारीख जवळ येतेय म्हणून…”
‘सिकंदर’च्या शूटिंगची सुरुवात मे महिन्यात सुरू होणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण भारत आणि युरोपमध्ये होणार आहे. चित्रपटाच्या बजेटबद्दल जरी अजूनही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अंदाजे या चित्रपटाचं बजेट ४०० कोटी इतकं असल्याचं बोललं जातंय. चाहते सलमान खान आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.