सलमान खान हा सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाबरोबरच त्याच्या दबंग टूरमुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या कॉन्सर्टची घोषणा केली होती. आता हा कॉन्सर्ट कोलकाता येथे होणार आहे. या कॉन्सर्टच्या तिकिटाची किंमत आता समोर आली आहे.
उद्या म्हणजेच १३ मे रोजी सलमान खानचा दबंग कॉन्सर्ट कोलकाता येथे संपन्न होणार आहे. या कॉन्सर्टमध्ये फक्त सलमान खानच नाही तर बॉलीवूडमधील अनेक आघाडीचे स्टार्स सहभागी होणार आहेत. त्याच्या या कॉन्सर्टची तिकिटे खूप पटापट विकली जात आहेत.
आणखी वाचा : “मला सलमान खानशी लग्न करायचंय…” प्राजक्ता माळीचं वक्तव्य चर्चेत; म्हणाली…
सलमान खानचा हा कॉन्सर्ट पाहण्यासाठी त्याच्या कोलकत्ता येथील चाहत्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. या कॉन्सर्टचे सर्वात स्वस्तातले तिकीट ६९९ रुपये आहे. हे गॅलरी झोन १०चे तिकीट आहे. तर या पाठोपाठ १२५० रुपयाला गॅलरी झोन ११चे तिकीट मिळेल. या कॉन्सर्टच्या भाईजान झोन (गॅलरीचे) तिकीट १५०० रुपये आहे, टायगर झोनचे तिकीट २२५० आहे, किक झोनचे तिकीट २५०० आहे, भाईजान झोनचे तिकीट ३००० आहे, सुलतान झोनचे तिकीट ४००० तर वॉन्टेड झोनचे तिकीट ६००० आहे, रेडी झोनचे तिकीट १२००० आहे. तरी यानंतर दबंग झोनचे तिकीट थेट ६० हजार रुपये आहे. तर तीन लाऊंजपैकी एका लाऊंजचे तिकीट १ लाख, दुसऱ्या लाऊंजचे तिकीट २ लाख आणि तिसऱ्या लाऊंजचे तिकीट ३ लाख आहे.
हेही वाचा : “हा वेडा झाला आहे का…?” ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यामुळे सलमान खान ट्रोल
सलमान खानच्या या दबंग टूरमध्ये सोनाक्षी सिन्हा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, प्रभुदेवा, आयुष शर्मा, मनीष पॉल, गुरू रंधावा हे कलाकार सहभागी होणार आहेत. सलमान खानचा हा कॉन्सर्ट शनिवारी म्हणजे १३ मे रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून कोलकाताच्या ईस्ट बंगाल क्लबच्या मैदानावर रंगणार आहे.