अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा १ ते ३ मार्च २०२४ यादरम्यान गुजरातमधील जामनगर इथं मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला भारतातीलच नव्हे तर जगभरातील पाहुण्यांनी हजेरी लावली होती. बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनाही जामनगरमध्ये निमंत्रित करण्यात आलं होतं. आता जवळपास महिनाभराने पुन्हा काही सेलिब्रिटी जामनगरला गेले आहेत.
सलमान खान, ऑरी हे जामनगरला पोहोचले आहेत. तर जान्हवी कपूर व तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियादेखील जामनगरला जाणार आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की अचानक हे सर्वजण जामनगरला का जात आहेत, तर यावेळीही निमित्त अनंत अंबानीच आहे. १० एप्रिलला अनंत अंबानीचा २९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हे सेलिब्रिटी वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला जामनगरला जात आहेत.
Video: आमदार धिरज देशमुखांच्या सासूबाईंना पाहिलंत का? रकुल व जॅकीबरोबरचा व्हिडीओ होतोय व्हायरल
व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये सलमान ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसला होता. सोबत त्याचा बॉडीगार्ड शेराही होता. ते दोघेही जामनगर विमानतळावर कारपर्यंत गेले.
ऑरीचा व्हिडीओही व्हायरल होत आहे, ज्यात तो विमानतळावर बॅग घेऊन दिसत आहे.
अनंत अंबानीच्या वाढदिवसाच्या आधी हे सेलिब्रिटी कलिना विमानतळावर व नंतर जामनगर विमानतळावर दिसले. त्यामुळे ते अनंत अंबानीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जामनगरला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. वाढदिवस १० तारखेला म्हणजेच उद्या आहे, त्यामुळे इंडस्ट्रीतील अनंतचे इतर मित्रही वाढदिवसासाठी जामनगरला जाण्याची शक्यता आहे.