एकेकाळी ११ दिवसांत ४७ चित्रपट साईन करणारा बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘आशिकी’ या सुपरहीट चित्रपटामुळे तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला हा अभिनेता मात्र बॉक्स ऑफिसवर फारकाळ राज्य करू शकला नाही. त्याने साईन केलेल्या ४७ चित्रपटांपैकी कित्येक चित्रपट डब्बाबंद झाले. आपल्या याच फिल्मी करकीर्दीबद्दल नुकतंच राहूलने एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

या मुलाखतीमध्ये राहुल रॉयने चित्रपटसृष्टीतील त्याच्या अनुभवांबद्दल भाष्य केलं आहे. याबरोबरच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने राहुल रॉयला त्याच्या पडत्या काळात कशी मदत केली याबद्दलही खुलासा केला आहे. २०२० मध्ये जेव्हा राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात दखल व्हावं लागलं होतं त्यावेळी सलमान खाननेच त्याची मदत केली होती.

khushi kapoor junaid khan
“अनेक विचित्र गोष्टी…”, खुशी कपूर आणि जुनैद खान एआयच्या गैरवापरावर झाले व्यक्त; म्हणाले, “लोकांनी स्वत:ला…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Khushi Kapoor
खुशी कपूरने कधी रिक्षाने प्रवास केलाय का? उत्तर देत म्हणाली, “आई-बाबांचा विरोध…”
Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter raha clicks Shaheen Bhatt photo
रणबीर कपूर-आलिया भट्टची दोन वर्षांची लेक झाली फोटोग्राफर! राहाने आई-बाबांचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो
Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू

आणखी वाचा : “इतरांना दोष देण्यात…” रोहित शेट्टी ‘सर्कस’च्या अपयशाबद्दल स्पष्टच बोलला

‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना राहुल रॉय आणि त्याची बहीण प्रियंका म्हणाली, “२०२० मध्ये राहुल ‘LAC – लिव द बॅटल इन कारगिल’चं चित्रीकरण करत होता तेव्हाच त्याला ब्रेन हॅमरेजचा सामना करावा लागला. त्याला तातडीने वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्याची एंजियोग्राफी करण्यात आली. त्यानंतर त्याला मुंबईच्या नानावटी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तो दीड ते दोन महीने होता, नानावटी हे तसे मोठे, महागडे असे रुग्णालय होते.”

पुढे प्रियंका म्हणाली, “त्यावेळी हातात काही फारसे चांगले प्रोजेक्ट नसल्याने त्यावेळी रुग्णालयाचे बरेच पैसे द्यायचे बाकी होते. ‘LAC’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पैसे जसे आले तसे आम्ही त्यातून रुग्णालयाचं बिल भरलं तरी एक मोठी रक्कम होती जी पूर्ण होत नव्हती. त्यावेळी सलमान खानने ते उरलेले पैसे भरले होते.”

सलमान खानने केलेल्या मदतीबद्दल प्रियंका म्हणाली, “मला सलमान खानचे आभार मानायचे आहेत. कारण आमची जेवढी देणी बाकी होती ती त्याने फेब्रुवारी महिन्यात देऊन टाकली. इतकंच नव्हे तर त्याने राहुलला फोन करून विचारपुसही केली. याबद्दल मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे याबद्दल त्याने कधीच वाच्यता केली नाही.” या संपूर्ण मुलाखतीमध्ये काही बोलता येत नसल्याने राहुल रॉय शांत होता. सलमान बद्दल मात्र तो म्हणाला, “सलमानबद्दल बरेच लोक उलट सुलट चर्चा करतात, पण माझ्यासाठी तो एक चांगला भला माणूस आहे.”

Story img Loader