बॉलीवूड अभिनेता सलमान खान वैयक्तिक आयुष्यात त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड महत्त्व देतो. सध्या स्टार किड्सच्या बॉलिवूड पदार्पणावरून सतत टीका होताना दिसते. अशातच आता लवकरच सलमानची भाची चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनेत्याला अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मा अशा दोन बहिणी आहेत. या दोन्ही बहिणींच्या मुलांबरोबर सलमानचं अतिशय सुंदर नातं आहे. अलविराची मुलगी अलिझेह चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याने सलमानने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : ‘जवान’ फेम संगीतकार अनिरुद्ध रविचंदर लवकरच ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर करणार लग्न? चर्चांना उधाण
सलमानने ही पोस्ट शेअर करताना अलिझेहबरोबरचा जुना फोटो शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता लिहितो, “तुझ्या मामूवर एक उपकार कर, जे काम करशील ते अगदी मनापासून कर…आयुष्यात सरळमार्गाने जायचंय हे नेहमी लक्षात ठेव. तुझी स्पर्धा ही फक्त तुझ्याशीच आहे.”
हेही वाचा : “खऱ्या आयुष्यात प्रेमात केव्हा पडणार?”, प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, “सध्या मी…”
सलमान खान पुढे लिहितो, “इंडस्ट्रीत फिट होण्यासाठी इतरांसारखी वागू नकोस आणि काहीतरी वेगळं करून सर्वांपासून वेगळी होऊ नकोस. जर एखाद्याला शब्द किंवा वचन दिलंस, तर तुझ्या मामूचंही ऐकू नकोस…ते वचन पूर्ण कर. ही गोष्ट कायम लक्षात ठेव.”
हेही वाचा : सेल्फी काढायला आलेल्या तरुणाने प्रसिद्ध अभिनेत्याला फेकून मारली बाटली, पुढे काय घडलं, तुम्हीच पाहा Video
अलिझेह अग्निहोत्री ही २२ वर्षाची असून ती अनेकदा सलमान खानबरोबर दिसली आहे. ती सलमान खानच्या ‘दबंग ३’ चित्रपटात झळकणार होती मात्र तिच्या वडिलांनी याबाबत नकार दिला होता. अलिझेह अग्निहोत्रीला अयान अग्निहोत्री हा मोठा भाऊ आहे. आता चित्रपट निर्माते सौमेंद्र पाधी यांनी त्यांच्या पुढील चित्रपटासाठी अलिझेहची निवड केल्याचे नंतर सांगण्यात येत आहे.