Salman Khan Bodygaurd Shera : बॉलीवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान सध्या लॉरेन्स बिश्नोईकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे चर्चेत आला आहे. अशा कठीण काळात भाईजानबरोबर सावलीप्रमाणे वावरणारा ‘शेरा’ गेली ३ दशकं त्याची खंबीरपणे सुरक्षा करत आहे. सलमान आणि शेरा या दोघांचं नातं गेल्या ३० वर्षांमध्ये बॉडीगार्ड व मालक यापलीकडे जाऊन ते दोघंही आता अगदी जिगरी मित्र झाले आहेत. सलमानच्या घरची कोणतीही पार्टी असो किंवा चित्रपटाचं शूटिंग ‘शेरा’ सलमानला कधीही एकटं सोडत नाही.

आता लॉरेन्स बिश्नोईकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांदरम्यान सलमानच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागला. यामुळेच भाईजानचं सतत संरक्षण करणारा हा बॉडीगार्ड शेरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या कठीण काळात सुद्धा शेरा अगदी सावलीप्रमाणे सलमानबरोबर असतो. सलमानमुळे आता शेरा देखील सेलिब्रिटी झाला आहे. कारण, सोशल मीडियावर शेराचा चाहतावर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्याला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज या ‘शेरा’ची गोष्ट जाणून घेऊयात…

Shahid Afriadi breaks silence on relationship rumours with Sonali Bendre
सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping
१२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Archana Puran Singh reveals how Rekha responded when she asked about the mystery man in her life
अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा

शेराबद्दल जाणून घ्या…

शेराचं खरं नाव गुरमीत सिंह जॉली असं आहे. ५५ वर्षीय शेरा गेल्या ३० वर्षांपासून सलमानचा अंगरक्षक म्हणून काम पाहत आहे. त्याचा जन्म १९६९ मध्ये मुंबईत झाला. अकरावीत असताना शिक्षणाला रामराम ठोकून शेराने वडिलांच्या गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण, त्याला बॉडीबिल्डिंगची प्रचंड आवड होती. त्याची प्रकृती व शरीरयष्टी लहानपणापासूनच सुदृढ होती. त्यामुळे १९८७ मध्ये त्याने ‘ज्युनिअर मिस्टर मुंबई’ आणि त्या पाठोपाठ १९८८ मध्ये त्याने ‘मिस्टर महाराष्ट्र’ स्पर्धेचं उपविजेतं पद पटाकावलं होतं.

१९९५ मध्ये शेराने त्याच्या मुलाच्या नावावरून ‘टायगर सिक्युरिटी’ ही कंपनी सुरू केली होती. याचवेळी भाईजानचा भाऊ सोहेल खानने त्याच्याकडे सलमानच्या सुरक्षेसाठी मागणी केली होती. यानंतर सोहेल, अर्पिता यांनी शेराची सलमानशी ओळख करून दिली. पुढे, जाऊन शेरा सलमानचा वैयक्तिक अंगरक्षक झाला.

हेही वाचा : लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या; सलमानने न घाबरता घेतला मोठा निर्णय, संपूर्ण टीम लागली कामाला

सलमानचा ( Salman Khan ) वैयक्तिक बॉडीगार्ड म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर शेराने प्रत्येक इव्हेंट, चित्रपटाचे सेट आणि शूटिंगदरम्यान भाईजानला सावलीप्रमाणे साथ दिली. जवळपास ३० वर्षे उलटूनही शेरा सलमानच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. त्याने अनेक मुलाखतींमध्ये “जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाईबरोबर राहणार…त्याच्यासाठी जीव सुद्धा देईन” असं सांगितलं आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉडीगार्ड’ चित्रपट सलमानने शेराला डेडिकेट केला होता. २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्याने शेरा पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

Salman Khan Bodygaurd Shera
Salman Khan Bodygaurd Shera

दरम्यान, सलमानशिवाय ( Salman Khan ) शेराच्या ‘टायगर सिक्युरिटी’ कंपनीने अनेक दिग्गजांना सुरक्षा पुरवली आहे. यामध्ये हॉलीवूडमधल्या माइक टायसन, ब्रायन ॲडम्स, केनू रीव्स, पॅरिस हिलटन आणि जस्टिन बिबर या दिग्गजांचा समावेश आहे.

Story img Loader