प्रेक्षक चित्रपट पाहताना पडद्यावर दाखवली जाणारी गोष्ट पाहतात. कलाकारांचा अभिनय, सेटअप, गाणी, कथा या बाबींकडे प्रेक्षक कटाक्षाने पाहत असतात. कलाकार त्यांच्या अभिनयाने आपला स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण करतात. मात्र, अनेकदा एखादा चित्रपट जेव्हा प्रेक्षकांसमोर येतो, त्यावेळी काही गोष्टी घडलेल्या असतात. आता निर्माते शैलेंद्र सिंग यांनी ‘फिर मिलेंगे’ या चित्रपटात सलमान खान (Salman Khan)ने साकारलेल्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खानने साकारलेली HIV मुलाची भूमिका

निर्माते शैलेंद्र सिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले, “फिर मिलेंगे या चित्रपटात सलमान खानने जी एचआयव्ही (HIV) पॉझिटिव्हची भूमिका साकारली आहे, ती भूमिका साकारण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी नकार दिला होता. मात्र, सलमान खानने ती भूमिका साकारली आणि त्याचे मानधन म्हणून त्याने फक्त एक रुपया घेतले.

“एक एचआयव्ही (HIV) पॉझिटिव्ह मुलगा जो चित्रपटाच्या शेवटी मरतो, त्यामुळे सलमानचे चाहते नाराज होणार होते. ही भूमिका कोणी करायला तयार नव्हते, पण सलमान खानने ती भूमिका साकारली. त्या काळात सलमान खानचा तरुणाईवर प्रभाव होता, आजही आहे. त्या चित्रपटातून तरुणाईला मेसेज द्यायचा होता, तो महत्त्वाचा होता. एड्सबाबत संपूर्ण देशात तरुणाईमध्ये जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे होते. हा चित्रपट फक्त सिनेमागृहात पाहिला गेला नाही तर तो टीव्ही, केबल, सॅटेलाइट सगळीकडे पाहिला गेला”, असे म्हणत निर्मात्याने सलमान खानचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: मुहूर्त ठरला! नवरात्रोत्सवात सुरू होणार ‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘उदे गं अंबे’; कोणती जुनी मालिका घेणार निरोप?

हा व्हिडीओ शेअर करताना शैलेंद्र सिंग यांनी “सलमान खानचे हृदय खूप मोठे आहे”, अशी कॅप्शन दिली आहे.

२००४ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘फिर मिलेंगे’ या चित्रपटात सलमान खानबरोबर शिल्पा शेट्टी आणि अभिषेक बच्चन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. रेवती यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

सलमान खानने १९८८ च्या ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेत्याने सहाय्यक भूमिका साकारली होती. १९८९ ला ‘मैंने प्यार किया’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan played role hiv positive person in phir milenge movie charged only one rupee nsp