Sikandar Poster : सलमान खानचे चाहते सध्या ‘सिकंदर’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. साजिद नाडियाडवाला निर्मिती ‘सिकंदर’ या चित्रपटाची गेल्या वर्षी घोषणा करण्यात आली. तेव्हापासून ‘सिकंदर’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. नुकतंच ‘सिकंदर’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. हे पोस्टर सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यामुळे पहिल्यांदाच ‘सिकंदर’ चित्रपटातील सलमान खानचा पूर्ण लूक समोर आला आहे.

साजिद नाडियाडवाला निर्मित ‘सिकंदर’ चित्रपटाचं नवं पोस्टर पाहून चाहत्यांमधील उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. नव्या पोस्टरमध्ये सलमान खानचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. ईदचं औचित्य साधून यंदा सलमान खानचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे ‘सिकंदर’ चित्रपटाबाबत २७ फेब्रुवारीला मोठं सरप्राइज मिळणार आहे. याबाबत निर्मात्यांनी सांगितलं की, प्रिय चाहत्यांचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. साजिद नाडियाडवालाच्या वाढदिवसानिमित्ताने ‘सिकंदर’वर जे काही प्रेम मिळालं, त्यानंतर आम्ही तुमच्यासाठी एक खास सरप्राइज घेऊन येत आहोत. २७ फेब्रुवारीला एक मोठं सरप्राइज तुमची वाट पाहत आहे.

‘सिकंदर’ चित्रपटात कोणते कलाकार झळकणार?

दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खानबरोबर रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसंच काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, शर्मन जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर ‘सिकंदर’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सलमान खानच्या या बहुचर्चित चित्रपटाचं दिग्दर्शन ए.आर.मुरुगदॉस करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी सलमान खान ‘सिकंदर’ चित्रपटाचं चित्रीकरण हैदराबादमध्ये करताना दिसला होता. हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेस या ऐतिहासिक ठिकाणी सलमान पाहायला मिळाला होता. हैदराबादमधील हे ऐतिहासिक ठिकाण सलमान खानसाठी खूप खास आहे. कारण त्याची बहीण अर्पिताचं लग्न ताज फलकनुमा पॅलेसमध्ये झालं होतं. इथेच तिने आयुष शर्माशी लग्नगाठ बांधली होती.

Story img Loader