Salman Khan Movie Sikandar New Teaser : सध्या सलमान खानच्या चाहत्यांचं लक्ष ‘सिकंदर’ चित्रपटाकडे लागून राहिलं आहे. ए.आर.मुरुगदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपट ईदचं औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित या चित्रपटाची सलमानचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सिकंदर’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदात सलमान खान आणि रश्मिका मंदानाची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकताच ‘सिकंदर’ चित्रपटाचा दुसरा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये सलमान आणि रश्मिकाची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे.

जेव्हा ‘सिकंदर’ चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून सलमान खानच्या ( Salman Khan ) या आगामी चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे. ‘सिकंदर’ प्रदर्शित होण्यासाठी बराच वेळ आहे. पण निर्माते सातत्याने या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सलमान खानच्या वाढदिवशी ‘सिकंदर’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित केला होता. आता पुन्हा एकदा नवा टीझर प्रदर्शित केला आहे. पण, पहिल्यापेक्षा दुसऱ्या टीझर जबरदस्त असून यामध्ये रश्मिका मंदानाची पहिली झलक झाली आहे.

‘सिकंदर’च्या पहिल्या टीझरमध्ये फक्त सलमान खानचे ( Salman Khan ) अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळाले होते. १.४२ मिनिटांच्या पहिल्या टीझरमध्ये सलमान खानचा एक डायलॉग खूप चर्चेत राहिला होता. “सुना है बहुत सारे लोग मेरे पीढे पडे है, बस मेरे मुडने की देर है”, असा जबरदस्त डायलॉग सलमान खान म्हणताना दिसला होता. आता दुसऱ्या ‘सिकंदर’च्या टीझरमध्ये त्याहून जबरदस्त डायलॉग, अ‍ॅक्शन पाहायला मिळत आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे नवीन टीझरमध्ये सलमान खान आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.

दरम्यान, सलमान खानच्या ( Salman Khan ) ‘सिकंदर’ चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवालाने केली आहे. सलमान खान आणि साजिद नाडियाडवालाची जोडी १० वर्षांनंतर एकत्र काम करत आहे. ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान, रश्मिका व्यतिरिक्त काजल अग्रवाल, सुनील शेट्टी, शर्मन जोशी, सत्यराज, प्रतीक बब्बर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. यंदा ईदचं औचित्य साधून ‘सिकंदर’ प्रेक्षकांच्या भेटीस येत असला तरी अद्याप तारीख जाहीर केलेली नाही.

Story img Loader