बॉलीवूडचा भाईजान सध्या त्याच्या कामाबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. सलमान खानला ( Salman Khan ) सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. असं असलं तरी सलमान कामासंदर्भात दिलेला शब्द पाळताना दिसत आहे. ‘बिग बॉस १८’च्या चित्रीकरणानंतर त्याने ‘सिकंदर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात केली आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने सलमान खान नुकताच हैदराबादमध्ये पोहोचला आहे.

२०२५ला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘सिकंदर’ चित्रपटाचं चित्रीकरण हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेसमध्ये होत आहे. त्यामुळे सलमान खान ( Salman Khan ) हैदराबादमध्ये पोहोचला आहे. ताज फलकनुमा पॅलेस हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. याच ठिकाणी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या एक दिवसाआधी सलमान खान पोहोचला. हे ऐतिहासिक ठिकाण सलमानसाठी खूप खास आहे. कारण त्याची बहीण अर्पिताचं लग्न ताज फलकनुमा पॅलेसमध्ये झालं होतं. इथेच तिने आयुष शर्माशी लग्नगाठ बांधली होती.

vidya balan reveals kartik aaryan love life
कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 movie second day collection
Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : दुसऱ्या दिवशीही ‘सिंघम अगेन’ ‘भुल भुलैया ३’वर पडला भारी, तीन दिवसांतच १०० कोटींची कमाई करणार अजय देवगणचा चित्रपट
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”

हेही वाचा – Bigg Boss 18: आता ‘बिग बॉस १८’चं होस्टिंग करणार रवि किशन, सलमान खानची घेतली जागा? नेमकं काय घडलंय? वाचा…

हेही वाचा – Video: ‘वहिनी’ हाक मारताच लाजली निक्की तांबोळी, अरबाज पटेलबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

‘सिकंदर’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान खान ( Salman Khan ) तैनात केलेल्या सुरक्षा रक्षकांसह विमानतळावर पोहोचला होता. गेल्या महिन्यात सलमानच्या जवळचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येच्या सहा दिवसांनंतर सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. तेव्हापासून सलमानबरोबर वैयक्तिक सुरक्षेसह वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानला आणखी जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. याप्रकरणात पोलिसांनी नोएडामधील एका तरुणाला अटक केली आहे. तर दुसऱ्याला मुंबईतील बांद्रा येथून ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा – Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : दुसऱ्या दिवशीही ‘सिंघम अगेन’ ‘भुल भुलैया ३’वर पडला भारी, तीन दिवसांतच १०० कोटींची कमाई करणार अजय देवगणचा चित्रपट

दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटाच दिग्दर्शन एआर मुरुगादॉस करत आहेत. या चित्रपटात सलमान खानसह ( Salman Khan ) रश्मिका मंदाना, सुनील शेट्टी आणि काजल अग्रवाल प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Story img Loader