बॉलिवूडमधील कलाकारांचे अफेअर्स हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सलमान खान व ऐश्वर्या राय यांचं अफेअर हे बॉलिवूडमधील गाजलेल्या प्रेमप्रकरणांपैकी एक आहे. संजय भन्साली यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमान खान व ऐश्वर्याने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यांची ऑन स्क्रीन जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
‘हम दिल दे चुके सनम’च्या शूटिंगदरम्यानच भाईजान व ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले होते. परंतु, त्यांचं अफेअर जास्त काळ टिकलं नाही. काही कारणास्तव सलमान खान व ऐश्वर्या यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर बऱ्याच काळाने ऐश्वर्याने एका मुलाखतीत सलमान खानबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं होतं. यावेळी तिने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.
हेही वाचा- सलमान खानने अनेक कलाकारांचं करिअर केलंय उद्ध्वस्त? भाईजान म्हणाला, “मी जेव्हा दारू पितो…”
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सलमान खानबरोबर ब्रेकअपच्या चर्चांवर मौन सोडलं होतं. मद्यधुंद अवस्थेत सलमानने तिला अनेकवेळा मारहाण केल्याचा आरोप ऐश्वर्याने केला होता.“ब्रेकअपनंतर सलमान खान मला फोन करुन त्रास द्यायचा. माझं सह कलाकाराबरोबर अफेअर असल्याचा त्याला संशय होता. शाहरुख खानपासून ते अभिषेकपर्यंत सगळ्यांबरोबर त्याने माझं नाव जोडलं होतं,” असं ऐश्वर्या म्हणाली होती.
त्याच पार्श्वभूमीवर आता सलमान खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने यासंदर्भात धक्कादायक उत्तर दिले आहे सलमान खानच्या फॅन क्लबने त्याच्या मुलाखतीची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये सलमानला विचारण्यात आले की, तुम्ही कधी एखाद्या महिलेवर हात उचलला आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान खान म्हणाला, ‘आता ती जर असं म्हणतं असेल तर माझ्याकडे उत्तर देण्यासारखं काय आहे ? जाऊ द्या…
हेही वाचा- “एक गेला म्हणून काय झाले, दोन-चार जण…,” जिया खान आत्महत्या प्रकरणावर राखी सावंतची प्रतिक्रिया
यानंतर सलमानला असा प्रश्नही विचारण्यात आला की, त्याला त्यात पडायचे नाही का? तेव्हा सलमानने उत्तर दिले की, एकदा एका पत्रकाराने मला (मारण्याबद्दल प्रश्न) विचारला होता. मी म्हणालो, ‘ मी जर कोणाला मारलं असेल तर साहजिकच भांडण झालं असेल, मी रागावलो असेन ना.. जर मी तिला मारलं असतं तर ती जगू शकली असती, अस मला वाटत नाही. आणि असं का सांगितले गेले हेही मला माहीत नाही’ असे सांगत सलमानने आपण कोणालाही मारहाण केली नसल्याचे स्पष्ट केले.
काय आरोप केले होते ऐश्वर्याने
“सलमान खानने मला मारलंही होतं. माझं नशीब चांगलं, म्हणून माझ्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आल्या नाहीत. काहीच झालं नाही, असं दाखवून मी शूटिंगसाठी जायचे. त्याने मला खूप त्रास दिला आहे. त्याचे फोन न उचलल्यावर तो स्वत:ला दुखापत करुन घ्यायचा. २००१ साली त्याने दारू पिऊन माझ्या घराबाहेर तमाशा केला होता. माझ्या वडिलांनी त्याच्याविरोधात तक्रारही केली होती,” असंही ऐश्वर्याने सांगितलं होतं.