सलमान खान व कतरिना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर काही ठिकाणी तर चाहत्यांनी सलमानचा चित्रपट स्क्रिनवर चालू असताना थिएटर्समध्येच फटाके फोडले. या संपूर्ण प्रकारावर सलमान खाननेही प्रतिक्रिया दिली आहे.

‘टायगर ३’ ची दणक्यात सुरुवात, सलमान-कतरिनाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले ‘तब्बल इतके कोटी

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सलमानचे चाहते चित्रपटगृहात फटाके फोडताना दिसत आहेत. टायगरच्या एन्ट्रीचा सीन येतो आणि चित्रपटगृहात प्रेक्षक फटाके फोडतात. त्यानंतर पूर्ण चित्रपटगृहात फटाक्यांचा धूर होतो. यावेळी काही प्रेक्षक तिथून बाहेर पडताना दिसतात. हा व्हिडीओ नाशिक येथील मालेगावचा आहे, असं म्हटल जातंय.

सलमान खानची प्रतिक्रिया

“‘टायगर ३’ चित्रपट चालू असताना थिएटरमध्ये फटाके फोडले गेले, असं मी ऐकत आहे. हे धोकादायक आहे. स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात न घालता चित्रपटाचा आनंद घ्या. सुरक्षित राहा,” असं सलमान खानने त्याच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, ‘टायगर ३’ने पहिल्याच दिवशी जगभरात तब्बल ९४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. भारतात चित्रपटाने ५२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. सलमान खानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हा सलमानचा सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.

Story img Loader