बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिकांमुळे, कधी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या भूमिकांमुळे तर कधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चेत असतात. याबरोबरच या कलाकारांविषयी जे इतरांकडून किस्से सांगितले जातात. त्यामुळेदेखील हे कलाकार चर्चेचा भाग बनतात. आता अभिनेता सलमान खान अशाच एका कारणामुळे चर्चेत आला आहे.
सलमान खानबद्दल काय म्हणाला निखिल अडवाणी?
निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘वेदा’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिग्दर्शकाने सलमान खानबरोबर जेव्हा ‘सलाम ए इश्क’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला आहे. तो म्हणतो, “या चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला दिवस होता. आम्ही मुहूर्ताचे शूटिंग करीत होतो. सेटवर त्यावेळी खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. ५०० कनिष्ठ कलाकार, २०० डान्सर, कोरिओग्राफर, सलमान खान व प्रियांका चोप्रा हे सगळे हजर होते. सलमान मॉनिटरकडे बघत उभा होता आणि मी म्हटलं, शाहरुख, तयार आहेस? मी असं म्हटल्याबरोबर संपूर्ण सेटवर शांतता पसरली. सलमानने माझ्याकडे पाहिलं, संपूर्ण सेट शांत होता. तो म्हणाला, हो करण, मी तयार आहे. अशी आठवण निखिलने सांगितली आहे.
पुढे बोलताना निखिलने म्हटले, “या चित्रपटाच्या आधी मी करण जोहरबरोबर ‘कभी खुशी कभी गम’ व ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटांत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. तसेच शाहरुखची मुख्य भूमिका असलेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर करण जोहरबरोबर माझे भांडण झाले आणि धर्मा प्रॉडक्शनमधून मी बाहेर पडलो.
हेही वाचा: Shilpa Shetty : लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीची पोस्ट, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी..”
ज्या क्षणी धर्मा प्रॉडक्शनमधून मी बाहेर पडलो त्यावेळी मला सलमान खानचा फोन आला आणि त्याने मला येऊन भेट, असे सांगितले. तो मला म्हणाला की, आता तू माझ्यासाठी काम कर, माझ्यासाठी चित्रपट बनव. सलमान चित्रपटसृष्टीतील मसीहा आहे. करणबरोबर झालेल्या वादानंतर तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने मला वचन दिले की, माझ्या पुढच्या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत काम करेल. मी सूरज पांचोलीची मुख्य भूमिका असलेला हीरो हा चित्रपट दिग्दर्शित केला. कारण- मला सलमानने फोन केला होता. हीरो आणि कट्टी-बट्टी असे दोन चित्रपट मोठे फ्लॉप ठरले”, अशी आठवण निखिल अडवाणीने सांगितली आहे.
दरम्यान, सलमान खान आणि शाहरुख खान या दोन्ही अभिनेत्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याबरोबरच या दोन अभिनेत्यांच्या मैत्रीची चर्चादेखील अनेकदा होताना दिसते.