बॉलीवूड अभिनेता व सलमान खानचा भाऊ अरबाज खानने २४ डिसेंबर २०२३ रोजी दुसरं लग्न केलं. त्याने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी बहीण अर्पिता खानच्या घरी निकाह केला. त्याच्या लग्नाला सलमान खान, सोहेल खान, वडील सलीम खान, आई सलमा व हेलन यांच्यासह त्याचा मुलगा अरहानदेखील उपस्थित होता. अरबाजच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सलमान खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉस १७ च्या ग्रँड फिनालेमध्ये भारती सिंगने सलमान खानला अरबाज खानच्या लग्नाबाबत काही प्रश्न विचारले. बिग बॉस १७ च्या फिनालेमध्ये अरबाज खान व सोहेल खानही आले होते. यावेळी या तिघा भावांची चेष्टा-मस्करी पाहायला मिळाली. भारती सिंगने स्टेजवर उपस्थित अरबाजला गंमतीत विचारलं की, “तुम्ही आम्हाला तुमच्या लग्नाला बोलावलं नाही.” अरबाज म्हणाला, “त्यात काय, मी तुला पुढच्या लग्नाला बोलावेन. पण दुसऱ्याच्या लग्नात.”
अरबाज असं म्हटल्यावर भारती सिंगने सलमान खानला प्रश्न विचारला. “मोठा भाऊ म्हणून तुम्ही अरबाजला लग्नाबाबत कोणताही सल्ला दिला नाही का?” यावर सलमान खान हसतो आणि म्हणतो “अरबाज कोणाचंही ऐकत नाही, जर तो ऐकता असता तर…”. यानंतर तो बोलणं थांबवतो. मग भारती स्टेजवर उपस्थित असलेल्या सोहेलच्या स्टाइलची खिल्ली उडवते. चप्पल आणि शॉर्ट्स घालण्याच्या त्याच्या कॅज्युअल फॅशन सेन्सची ती चेष्टा करते, ते ऐकून सलमान खानही हसतो.
दरम्यान, अरबाज खानने त्याच्यापेक्षा २५ वर्षांनी लहान शुरा खानची दुसरं लग्न केलं. अरबाजचं पहिलं लग्न मलायका अरोराशी झालं होतं. १९ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी सहा वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला आणि त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे. घटस्फोटानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तर अरबाजने शुराशी लग्न केलंय.