बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी सलमानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला धमकीचा मेल पाठविण्यात आला होता. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सलमानने सुरक्षेखातर बुलेट प्रुफ एसयुव्ही गाडीचा समावेशही ताफ्यात करुन घेतला होता. आता पुन्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी(१० एप्रिल) मुंबई पोलिसांना रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास जोधपूरहून धमकीचा फोन आला होता. या फोनद्वारे “३० एप्रिलला सलमान खानची हत्या करू” अशी धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने स्वत:ची ओळक रॉकी भाई अशी करुन दिली आहे. रॉकी भाई एक गोरक्षक असल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा>> उर्फी जावेदबाबत महिला नेत्याची प्रतिक्रिया, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तिचे कपडे…”

सलमान खानला याआधीही अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने मार्च महिन्यात तुरुंगातून एबीपी न्यूजला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने सलमानने माफी मागावी अन्यथा त्याला मारुन टाकू असं म्हणत कॅमेऱ्यासमोरच धमकी दिली होती.

हेही वाचा>> Video: अ‍ॅक्शन सीन्सचा थरार, रोमँटिक अंदाज अन्…; सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान, सलमान खानच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ईदच्या मुहुर्तावर २१ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.