सुपरस्टार मनोज बाजपेयी त्यांच्या अनोख्या भूमिकांमुळे सतत चर्चेत असतात. अनेक वर्षं या अभिनेत्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मनोज बाजपेयींच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत. १९९८ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ या चित्रपटातील त्यांचं भिकू म्हात्रे नावाचं पात्र खूप गाजलं होतं. या पात्रासाठी मनोज बाजपेयी यांना ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ असं नामांकनदेखील मिळालं होतं. परंतु हा पुरस्कार त्यांच्या नावे झालाच नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाईजान सलमान खानला मनोज बाजपेयींऐवजी हा पुरस्कार मिळाला. त्यादरम्यान पुरस्कार स्वीकारताना सलमानने माझ्यापेक्षा या पुरस्कारासाठी मनोज अधिक पात्र आहे असंदेखील म्हटलं होतं. मनोज बाजपेयी यांच्या बॉलीवूड कारकीर्दीमधील त्यांचा १०० वा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने त्यांनी ‘पिंकविला’ला भेट दिली होती. या मुलाखतीदरम्यान मनोज बाजपेयी यांनी या पुरस्कार सोहळ्याबद्दल सांगितलं आहे.

हेही वाचा… VIDEO: “१४ लोकं मृत पावले अन् ही…”, मनारा चोप्राच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकरी संतप्त, म्हणाले…

पिंकविलाच्या मुलाखतदाराने प्रश्न विचारला की, “१९९८ रोजी एका आर्टिकलमध्ये एका पुरस्कार सोहळ्याबद्दल लिहिलं होतं. ज्यात मनोज बाजपेयींच्या ‘सत्या’चित्रपटासाठी आणि सलमान खानच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्या’चं नामांकन होतं. त्यावेळेस सलमान म्हणाला होती की हा पुरस्कार मनोज बाजपेयींनी मिळायला हवा. हे कितपत खरं आहे.”

यावर मनोज बाजपेयी उत्तर देत म्हणाले, “हो हे खरं आहे कारण हे जेव्हा घडल तेव्हा आम्ही तिथेच होतो. जेव्हा पुरस्कार सोहळ्यात विजेत्याच सलमान खान असं नाव जाहीर झालं तेव्हा प्रेक्षक खूप नाराज झाले होते. लोक उभे राहून “भिकू म्हात्रे, भिकू म्हात्रे” असं ओरडतं होते. जेव्हा सलमान पुरस्कार घेण्यासाठी मंचावर गेला तेव्हा तो म्हणाला की, मला माहित नाही हा पुरस्कार यांनी मला का दिला? या पुरस्काराचा खरा मानकरी मनोज आहे.”

हेही वाचा… चेहऱ्याला फेस पॅक अन्…, ‘बिग बॉस’ फेम २० वर्षीय अब्दु रोजिकने केली लग्नाची जय्यत तयारी, म्हणाला…

मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, “हे बोलायला पण थूप मोठ ह्रदय असावं लागतं. सलमान असं बोलला हे पाहून मला खरंच खूप छान वाटलं . इंडस्ट्रीमध्ये अशीदेखील लोकं आहेत जी खरंच दुसर्यांच्या कामाचं कौतुक करतात. त्यावेळेस मला क्रिटीक्स अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारदेखील मिळाला होता.”

हेही वाचा… राखी सावंत रुग्णालयात दाखल; ह्रदयाशी संबंधित आजारामुळे बिघडली प्रकृती; फोटो व्हायरल

दरम्यान, मनोज बाजपेयींच्या बॉलीवूड कारकीर्दीमधील १०० वा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित ‘भैय्याजी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रजर्शित झाला आहे. हा मनोज बाजपेयींचा १०० वा चित्रपट असणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan rejected an award of popular film for manoj bajpayee dvr