Salman Khan Resumes Sikandar Shoot : सलमान खान गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोईकडून येणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच भाईजानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे हत्या करण्यात आली. या हल्ल्याची जबाबदारी फेसबुक पोस्ट शेअर करत बिश्नोईच्या टोळीतील सदस्याने स्वीकारली होती. या पोस्टमधून पुन्हा एकदा सलमानला इशारा देण्यात आला होता. या घटनेनंतर त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमानला ( Salman Khan ) घराबाहेर न जाण्याच्या सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, भाईजान कसलाही विचार न करता बाबा सिद्दीकींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता. यानंतर गेल्या वीकेंडला सलमानने ‘बिग बॉस’च्या शूटिंगला देखील सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे आमचं घर सुद्धा सलमानच्या सुरक्षेबाबत चिंतेत असल्याचं अरबाज खानने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सलमान त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंग बाबतीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लागलं होतं. मात्र, भाईजानने त्याचं कोणतंच काम पुढे न ढकलता शूटिंगला सुरुवात केली आहे. सलमान खान सतत मिळणाऱ्या धमक्यांदरम्यान पुन्हा एकदा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सिकंदर’ चित्रपटाच्या सेटवर परतला आहे. याबाबत ‘इंडिया टुडे’ने माहिती दिली आहे.

हेही वाचा : “काळवीटाची शिकार करणारा…”, सलमान खानने दुसऱ्याचा आरोप स्वतःवर घेतलेला? पाहा त्याचाच जुना व्हिडीओ

सलमान खान शूटिंगच्या सेटवर परतला

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस १८’ नंतर सलमान खानने ( Salman Khan ) ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरुवात केली आहे. “सलमान खान त्याच्या कामाप्रती पूर्णपणे डेडिकेटेड आहे. ‘बिग बॉस १८’च्या शूटिंगसाठी सेटवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. अगदी त्याचप्रमाणे चित्रपटाच्या सेटवर सुद्धा त्याची संपूर्ण टीम सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेत आहे आणि सलमान त्याच्यामुळे कुणालाही उशीर होणार नाही याची काळजी घेतोय. तो पुढच्या आठवड्यात दिवाळीपर्यंत ‘सिंकदर’साठी पूर्णवेळ शूटिंग करत राहण्याची शक्यता आहे.” अशी माहिती पोर्टलला एका सूत्राकडून मिळाली आहे. तसेच सलमानच्या टीमने त्याच्यासाठी खास वेळापत्रक देखील बनवलं आहे.

हेही वाचा : “बिश्नोई समाजात काळवीटांची पूजा करतात हे त्याला…”, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा दावा; म्हणाली, “तो खूप दयाळू…”

दरम्यान, सलमानच्या ( Salman Khan ) आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, ३० मार्च २०२५ म्हणजेच येत्या वर्षात ईदच्या दिवशी हा बहुप्रतिक्षीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिकंदर’मध्ये सलमानशिवाय रश्मिका मंदाना, सुनील शेट्टी, काजल अग्रवाल, शर्मन जोशी, अंजिनी धवन, प्रतीक बब्बर आणि सत्यराज या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan resume sikandar movie shoot amid death threats by lawrence bishnoi report softnews sva 00