अभिनेता सलमान खान सध्या ‘टायगर ३’ च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. त्याच्या चित्रपटाने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. सलमान त्याचा शूटिंग व प्रवासाव्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ घरी घालवतो. यावेळी तो काय करतो, याबाबत त्याने माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टुडे’शी बोलताना सलमान म्हणाला, “मी मागच्या २५ ते २६ वर्षांपासून कदाचित त्याहूनही अधिक काळापासून रात्री जेवायला (डिनर) घरातून बाहेर पडलेलो नाही. जेव्हा मला शूटिंग करायचं असतं तेव्हा मी प्रवास करतो. मी माझ्या लॉनमध्ये बसतो किंवा मग मी शेतात जातो तेवढाच वेळ मी घराबाहेर पडतो. माझा प्रवास म्हणजे घर, शूट, हॉटेल, विमानतळ, शूटिंगचे वेगवेगळे लोकेशन, घरी परतणं आणि नंतर जिम जाणं. बस इतकंच. मी माझ्या कुटुंबापेक्षा माझ्या स्टाफबरोबर जास्त वेळ घालवतो. मी खरेदीलाही जात नाही. अगदी अलीकडचं बोलायचं झाल्यास आई माझ्याबरोबर असताना सर्वात जवळच्या रेस्टॉरंटमध्ये कॉफी घेण्यासाठी मी बाहेर पडलो होतो, तेवढंच.”

“माझ्या दोन्ही पत्नी…”, जेव्हा सलीम खान यांनी आपल्या लग्नांबद्दल केलेलं भाष्य; म्हणाले, “मी ते जाणीवपूर्वक…”

५७ वर्षांचा सलमान खान अविवाहित आहे. तो पालकांबरोबर राहतो. तो फारसा घराबाहेर पडत नाही. त्याचे चित्रपट येणार असतील त्याच्या प्रमोशनसाठी तो जातो. शूटिंगशिवाय तो बॉलीवूडमधील काही इव्हेंट्सला हजेरी लावतो. तो फार प्रवासही करत नाही. तो त्याचा जास्तीत जास्त वेळ घरात घालवतो.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा ‘टायगर ३’ चित्रपट दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्याबरोबर कतरिना कैफ व इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. जगभरात ४०० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने भारतात २३० कोटींहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan reveals he spent most of time at home not gone for dinner from 25 years hrc