अभिनेता सलमान खान(Salman Khan)ने नुकतीच डंब बिर्याणी या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. हे यूट्यूब चॅनेल सलमान खानच्या पुतण्याचे आहे. या पॉडकास्टमध्ये सलमान खानने विविध विषयांवर गप्पा मारल्या. तरुण पिढीला काही महत्त्वाचे सल्ले दिले. माणसामधील उत्साह सर्वांत महत्त्वाचा असतो, तो कधी संपला नाही पाहिजे. नाही तर तुम्ही वयाच्या आधी वृद्ध होता, असे म्हणत सलमान खानने त्याची मते व्यक्त केली. त्याबरोबरच या पॉडकास्टमध्ये सलमान खानने मृत्यू जवळून पाहिल्याचे म्हणत एक घटनादेखील सांगितली आहे.

अचानक विमानाच्या इंजिनाचा…

सलमान खानने डंब बिर्याणी या पॉडकास्टमध्ये एका पुरस्कार सोहळ्यानंतर श्रीलंकेतून परतताना काय घडले होते याबाबतचा किस्सा सांगितला. सलमान खानने म्हटले की, आयफा पुरस्कार सोहळा संपल्यानंतर श्रीलंकेतून विमानातून परत येत होतो. सगळे जण हसत होते, गप्पा चालू होत्या. अचानक विमानाच्या इंजिनाचा आवाज येऊ लागला. तो आवाज काही क्षणांसाठी नव्हता. तर ४५ मिनिटे विमानाच्या इंजिनाचा आवाज येत होता. जवळजवळ सगळ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. माझ्याबरोबर सोहेलसुद्धा होता. मी सोहेलकडे पाहिले, तर तो शांतपणे झोपला होता. जेव्हा अशी काही गंभीर परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण एअर होस्टेसकडे आशेनं पाहतो. मात्र, मी एअर होस्टेसकडे पाहिलं, तर तीसुद्धा घाबरलेली दिसत होती. प्रार्थना करीत होती. पायलटसुद्धा काळजीत पडला होता की हे नेमकं काय चाललं आहे. ऑक्सिजन मास्क खाली पडत होते.

Man Kills Grandfather Janardhan Rao
धक्कादायक! देशातील प्रसिद्ध उद्योगपतीची नातवाकडून हत्या; मालमत्तेच्या वादातून आजोबांना ७३ वेळा चाकूने भोसकले!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
Rohit Sharma Statement on India Win and His Century in Cuttack IND vs ENG 2nd ODI
IND vs ENG: “इंग्लंडच्या गोलंदाजांनी माझ्या शरीराच्या दिशेने…”, रोहित शर्माचं शतकाबाबत मोठं वक्तव्य; भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?
Saif Ali Khan on knife attack Taimur asked me if I was going to die
हल्ल्यानंतर करीनाऐवजी ८ वर्षांचा तैमूर रुग्णालयात सोबत का आला? सैफ अली खानने सांगितलं कारण
Prashant Kishor on AAP loss In Delhi Election result 2025
Prashant Kishor on AAP loss : दिल्ली निवडणुकीत केजरीवालांच्या ‘आप’चा पराभव का झाला? राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितली कारणे
loksatta editorial on arvind kejriwal
अग्रलेख : ‘आप’ले मरण पाहिले…
Sanam Teri Kasam Re Release Box office day 2 crossed the lifetime collection of original
२०१६मध्ये फ्लॉप झालेल्या ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत मोडला जुना रेकॉर्ड

मी विचार केला की, हे सगळं चित्रपटात पाहिलं होतं, आता प्रत्यक्षात असं सगळं घडत आहे. ४५ मिनिटं हे सगळं सुरू होतं. त्यानंतर इंजिनातून आवाज येणं बंद झालं. त्यानंतर सगळे शांत झाले. पुन्हा हसणं, मजा असं चालू झालं. सोनाक्षी, तिची आईसुद्धा तिथेच होती. त्यांनतर पुन्हा इंजिनाचा आवाज यायला सुरुवात झाली. तो आवाज १० मिनिटं सुरू होता. त्यानंतर मात्र कोणीही एक शब्दही बोललं नाही. जोपर्यंत विमानाचा जमिनीला स्पर्श झाला नाही, विमानाचे दरवाजे उघडून सर्व जण बाहेर आले नाहीत, तोपर्यंत कोणीही बोललं नाही”, अशी आठवण सलमान खानने सांगितली.

दरम्यान, सलमान खानने याच पॉडकास्टमध्ये त्याच्या झोपेच्या सवयीबद्दलही वक्तव्य केले. त्याने म्हटले की, मी काही तास झोपतो. महिन्यातून एकदा मी ७-८ तास झोपतो. अनेकदा शूटिंग सुरू असताना ब्रेकमध्ये मी काही वेळ झोपतो. मला जेव्हा काहीच काम करण्यासाठी नसते, त्यावेळी मी झोपतो. जेव्हा मी तुरुंगात होतो, त्यावेळी चांगली झोप घेतली होती. तुम्ही असे काहीतरी काम केले पाहिजे की, तुम्हाला आपोआप झोप आली पाहिजे.

सलमान खान लवकरच सिकंदर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader