बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या लव्ह लाइफचीही अनेकदा चर्चा होते. ५७ वर्षांच्या सलमान खानने आजपर्यंत लग्न केलेले नाही. मात्र, त्याचे अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले. रजत शर्माच्या कार्यक्रमात नुकतेच सलमानने आपल्या तुटलेल्या नात्याबाबत मोठे विधान केले आहे.
हेही वाचा- “तिला माझ्या परवानगीची…” ऐश्वर्याला जास्त काम करु दे म्हणणाऱ्याला अभिषेक बच्चनने दिले उत्तर
सलमान खानने नुकतेच रजत शर्माच्या ‘आप की अदालत’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सलमानला त्याच्या प्रेम प्रकरणावरून प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रेमकथांवर आत्मचरित्र लिहिण्याचा विचार करीत आहे का? यावर अभिनेत्याने उत्तर दिले की, ‘माझ्या प्रेमकथा माझ्यासोबत कबरीत जातील.’ सलमान खानचे हे उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
सध्या तुझी प्रेयसी कोण आहे, असा प्रश्नही रजत शर्मांनी सलमानला विचारला होता. यावर सलमानने मजेशीर उत्तर दिले आहे. सलमान म्हणाला, “सध्या मी फक्त एक भाऊ आहे. ज्यांना मी जान म्हणत होतो त्या आता मला भाई म्हणतात. मी काय करू?” असे म्हणत सलमान हसला आणि त्याच्यासोबत उपस्थित प्रेक्षकही हसायला लागले.
हेही वाचा- जिया खान प्रकरणी निर्दोष मुक्तता होताच सूरज पांचोली सिद्धिविनायकाच्या चरणी; घेतला बाप्पाचा आशीर्वाद
‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला. जगभरातून या चित्रपटाने १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र, भारतात या चित्रपटाची जादू म्हणावी तशी चालताना दिसत नाहीये. आठवड्याभरात या चित्रपटाने केवळ ९२.१५ कोटी रुपयांचाच गल्ला जमवला आहे. या वीकेण्डला तरी चित्रपट चांगली कमाई करेल आणि १०० कोटी रुपये कमवील, अशी निर्मात्यांना आशा आहे.