सलमान खान हा गेले काही महिने त्याच्या आगामी चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे. ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची घोषणेपासून चर्चा होती. तर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलर लॉन्चच्या वेळी सलमान खानने केलेलं एक वक्तव्य सध्या खूप चर्चेत आलं आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलरला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटात सलमान खानबरोबर अभिनेत्री पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. पण यावेळी सलमान खानने हा चित्रपट फ्लॉप झाला तर काय होईल हे सांगितलं.
आणखी वाचा : “हा वेडा झाला आहे का…?” ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यामुळे सलमान खान ट्रोल
या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात या चित्रपटाचे दिग्दर्शक फरहाद सामजी म्हणाले, “एकत्र काम करण्यासाठी लोकांना सुपरस्टार मिळेल पण सलमान खान नशीबवानांनाच मिळतो.” तर यावर मस्करीत उत्तर देत सलमान म्हणाला, “जर हा चित्रपट अयशस्वी ठरला तर त्यासाठी मला जबाबदार धरण्यात येईल आणि हे म्हणतील, हाच तो माणूस आहे ज्याच्यामुळे चित्रपट चालला नाही. याची ओरिजिनल स्क्रिप्ट अजूनही माझ्याकडे आहे.”
हेही वाचा : “आता पुरे…” सलमान खानच्या गायकीने नेटकरी हैराण, नव्या गाण्यामुळे भाईजान ट्रोल
दरम्यान, सलमानचा हा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट तमिळ चित्रपट ‘वीरम’चा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेबरोबरच व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग देखील दिसणार आहेत.साजिद नाडियादवाला याची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.