Salman khan Dubai Tour : सलमान खान लवकरच दुबईत कडक सुरक्षा व्यवस्थेत, आपल्या चाहत्यांसमोर परफॉर्म करणार आहे. लॉरेन्स बिश्नोईकडून मिळणाऱ्या धमक्यांनंतरही सलमान प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. येत्या ७ डिसेंबरला दुबईत होणाऱ्या ‘दबंग द टूर- रीलोडेड’ या कार्यक्रमात सलमान खान आपला जलवा दाखवणार आहे.

सलमानसह सोनाक्षी सिन्हा, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, तमन्ना भाटिया, प्रभु देवा, मनीष पॉल, सुनील ग्रोवर आणि आस्था गिलसारखे कलाकारदेखील या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत. ‘दबंग द टूर- रीलोडेड’ हे दुबईतील हार्बर येथे आयोजित केले जाणार आहे.

हेही वाचा…सलमान खान करणार होता ‘गजनी’त मुख्य भूमिका, पण ‘या’ कारणाने आमिरची लागली वर्णी, खलनायकाने केला मोठा खुलासा

सध्या आगामी चित्रपट ‘सिकंदर’च्या शूटिंगमध्ये व्यग्र असलेल्या सलमानने या कार्यक्रमाबद्दल X वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करून घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये सलमानने लिहिले, “७ डिसेंबर २०२४ ला दुबईत होणाऱ्या दबंग द टूर- रीलोडेडसाठी तयार व्हा.” या पोस्टमध्ये सलमानने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांनाही टॅग केले आहे.

चाहत्यांनी केलं सलमानच्या धाडसाचं कौतुक

सलमान खानच्या या घोषणेनंतर चाहत्यांनी त्याच्या धाडसाची स्तुती केली आहे. एका चाहत्याने लिहिले, “सलमान खान थांबणार नाही.” तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलं, “याला म्हणतात प्रोफेशनलिझम.” आणखी एका चाहत्याने “लव्ह यू भाई, तू वाघासारखं न घाबरता पुढे जा” अशी कमेंट केली आहे, तर इतर चाहत्यांनी सलमानच्या धाडसाचं कौतुक करणाऱ्या कमेंट केल्या आहेत.

सलमान खानच्या चाह्त्त्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याच्या धाडसाच कौतुक केल आहे. (Photo Credit – Salman Khan Twitter)

हेही वाचा…एकामागोमाग एक १० सिनेमे झाले फ्लॉप, नैराश्यात गेली अभिनेत्री; एक्स बॉयफ्रेंडने वाचवलं करिअर

मुंबई पोलिसांनी सलमानला धमकी देणाऱ्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी जमशेदपूरमधून एका व्यक्तीला अटक केली आहे. सलमान खानकडून पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉटसअ‍ॅप हेल्पलाइनवर सलमानला धमकी देणारा मेसेज आला होता, ज्यात त्याच्याकडून पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला होता. यापूर्वीही लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या आणि टोळीच्या संशयित सदस्यांनी एप्रिलमध्ये सलमानच्या बांद्रा येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार केला होता.