ट्विटरने २० एप्रिल रोजी सर्व व्हेरिफाइड अकाउंट्सवरून ब्लू टिक काढून टाकल्या आहेत. इलॉन मस्क यांनी आधीच जाहीर केले होते की यापूढे ब्लू टिकसाठी युजर्सना पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत ज्यांनी पैसे भरले आहेत, त्यांची ब्लू टिक अजूनही आहे आणि ज्यांनी पैसे भरले नाहीत, त्यांचे अकाउंट आता व्हेरिफाइड दिसणार नाही. ब्लूट टिक गमावणाऱ्यांच्या यादीत मोठ्या स्टार्सच्या नावांचाही समावेश आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांसारख्या सुपरस्टार्सच्या अकाउंटवरूनही ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“हे लग्नाचं रिसेप्शन नाही”; आईच्या निधनानंतर आमिर खानला भेटताना हसणारा उदय चोप्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले, “निर्लज्ज…”

ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती की सबस्क्रिप्शन घेतले तरच २० एप्रिलनंतर ब्लू टिक कायम राहील. सबस्क्रिप्शन न घेणार्‍यांच्या ब्लू टिक्स काढल्या जातील. मासिक शुल्क भरूनच ब्लू टिकची सुविधा वापरता येईल. अशा परिस्थितीत सर्व ट्विटर हँडलवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आले आहे. मोबाईलसाठी दरमहा ९०० रुपये आणि वेब व्हर्जनसाठी ६५० रुपये भरावे लागतील.

एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेक दिग्गजांच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवली; अभिनेते, खेळाडूंचाही समावेश!

शाहरुख खानचे ट्विटरवर ४३.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. ट्विटरच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. मात्र आता त्याचं अकाउंट व्हेरिफाइड नाही. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांचेही ट्विटरवर ४८.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे ४६२२ ट्विट केले आहेत. त्यांच्या अकाउंटची ब्लू टिकही हटवली आहे.

ट्विटरवर सलमान खानचे ४५ मिलियन फॉलोअर्स आहेत. आज त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच्या अकाउंटचीही ब्लू टिक हटलवी होती. अक्षय कुमार सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी ट्विटरवर त्याचे ४५.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.

क्रिकेटपटू विराट कोहली, क्रिकेटर रोहित शर्मा यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही ब्लू टिक हटवण्यात आली आहे. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे खातेही आता व्हेरिफाइड नाही. महेंद्रसिंग धोनी, विजय, रजनीकांत यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही ब्लू टिक्स काढण्यात आल्या आहेत.