Tiger Vs Pathaan Budget : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने ४ वर्षांनी ‘पठाण’ या चित्रपटातून पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला. भारतात ५०० कोटी तर जगभरात ९०० कोटीहून अधिक कमाई या चित्रपटाने केली. शाहरुखच्या चाहत्यांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. याबरोबरच हा चित्रपट एवढा सुपरहीट होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे सलमान आणि शाहरुख या दोन सुपरस्टार्सचं एका चित्रपटात दिसणं. ‘पठाण’मधील सलमान खानचा कॅमिओ चांगलाच गाजला. खूप वर्षांनी प्रेक्षकांनी त्यांचे २ लाडके सुपरस्टार्स मोठ्या पडद्यावर एकत्र अॅक्शन करताना पाहिले.

आता मात्र शाहरुख आणि सलमानच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर समोर आली आहे. लवकरच हे दोघे‘टायगर वर्सेज पठाण’ या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटात शाहरुख आणि सलमान आमने सामने येणार आहेत. या चित्रपटाची तयारी सुरू झाली असून यासाठी जबरदस्त पैसा खर्च केला जाणार असल्याचं म्हंटलं जात आहे.

home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nirmala Sitharaman said Rs 14 131 crore recovered from Vijay Mallyas property sale
राव की रंक?
fight for post of Guardian Minister has begun among three parties in mahayuti
पालकमंत्रीपदावरून आता रस्सीखेच
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण खातेवाटप कधी होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी १४०० कोटी रुपये; ३५ हजार ७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
हजार कोटी रुपयांचा मालेगाव आर्थिक गैरव्यवहार काय आहे? हे प्रकरण खरेच ‘वोट जिहाद’ आहे का?
us dollar strength us dollar is likely to stay stronger for longer and market future
 बाजार रंग : डॉलरची दादागिरी आणि बाजाराचे भविष्य

आणखी वाचा : सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मधील गाण्यावर माजी क्रिकेटपटूचा आक्षेप; म्हणाले “अपमानकारक…”

‘टायगर vs पठाण’ हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. हृतिक रोशनच्या ‘वॉर २’चं शूटिंग पूर्ण झाल्यावर यश राज स्पाय युनिव्हर्सचा हा सर्वात मोठ्या प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य चोप्रा आणि यश राज स्टुडिओज यांनी या चित्रपटासाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल ३०० कोटींचे बजेट ठेवले असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : ‘या’ सेलिब्रिटींनीसुद्धा केलेला अभिनयाचा प्रयत्न; यांचे चित्रपट पाहून प्रेक्षकही म्हणाले “उठा ले रे देवा”

विशेष गोष्ट म्हणजे या ३०० कोटींमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांचे मानधन जोडले गेलेले नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दोघेही स्टार्स चित्रपटाच्या नफ्यात भागीदार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यश राज फिल्म्सचा हा आजवरचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचं म्हंटलं जात आहे. सलमान आणि शाहरुखचे चाहते यासाठी चांगलेच उत्सुक आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’ ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. सलमान खानचा याच युनिव्हर्समधील ‘टायगर ३’सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader