बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून एक नोटिस जाहीर केली आहे. ही नोटिस त्याच्या प्रोडक्शन कंपनी सलमान खान फिल्म्स संदर्भात देण्यात आली आहे. सलमान खान आणि त्याच्या प्रोडक्शन कंपनीच्या नावाचा वापर करून काही लोक चित्रपटासाठी थेट ऑडिशन घेत असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचं काही रीपोर्टमधून समोर आलं आहे.
याचसाठी सलमान खानने एक नोटिस शेअर करत याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. यात स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे की, “सलमान खान किंवा सलमान खान फिल्म्स कंपनीकडून सध्या कोणत्याही चित्रपटासाठी कास्टिंग केलं जात नाहीये. याबरोबरच पुढील चित्रपटांसाठी आम्ही कोणत्याही कास्टिंग एजेंटला काम दिलेलं नाही. त्यामुळे वरील कारणासाठी तुम्हाला कुणी संपर्क केला तर त्यावर विश्वास ठेवू नका. सलमान खान आणि त्याच्या कंपनीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
आणखी वाचा : कतरिना कैफ व विजय सेतुपती देणार यंदा ख्रिसमस स्पेशल गिफ्ट; आगामी ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
२०११ मध्ये सलमानने त्याची ही प्रोडक्शन कंपनी सुरू केली. यामध्ये त्याची आई सलमा खानसुद्धा सहभागी आहेत. नितेश तिवारी यांचा ‘चिल्लर पार्टी’ हा सलमानची पहिली निर्मिती असलेला चित्रपट.
नंतर ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’, ‘रेस ३’पासून ‘राधे’ अन् नुकताच आलेला ‘किसी का भाई किसी की जान’सारखे कित्येक सुपरहिट चित्रपट सलमान खान फिल्म्स या बॅनरखाली तयार झाले.