बॉलीवूड अभिनेता सलमान खान(Salman Khan) हा त्याच्या चित्रपटांसाठी जितका चर्चेत असतो तितकाच त्याच्या हटके अंदाजामुळे देखील चर्चांचा भाग बनतो. सध्या सलमान खान बिग बॉस १८ चे होस्टिंग करताना दिसत आहे. या शोचे तो गेल्या अनेक वर्षांपासून सूत्रसंचालन करताना दिसत आहे. बिग बॉस १८ मध्ये तो चुका करणाऱ्या सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसतो. आता मात्र सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा मोठ्या चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खानच्या ‘त्या’ कृतीची होतेय चर्चा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठीचे मतदान काल २० नोव्हेंबर २०२४ ला पार पडले. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी मतदान केल्याचे पाहायले मिळाले. अनेक कलाकारांनी मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवत फोटोसाठी पोजदेखील दिली. या सगळ्यात सलमान खानदेखील मतदान करण्यासाठी आल्याचे पाहायला मिळाले. कडक सुरक्षिततेत तो मतदान करण्यासाठी आला होता. मतदान करून जाताना पापाराझींनी त्याला शाई लावलेले बोट दाखविण्यासाठी सांगितले. त्यावेळी सलमानने हसत हसत बोट न दाखवता दोन्ही हात दाखवले. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

इन्स्टाग्राम

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटदेखील केल्या आहेत. “तुम्ही एक बोट दाखवायला सांगितले, त्याने हात दाखवला”, “सब का भाई, सभी के जान, प्यारे सल्लू भाईजान”, “इशारा पुरेसा आहे”, “असे वाटत आहे की चुलबूल भैय्या सिंघम बनले आहेत”, अशा प्रकारच्या नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. सलमान खानने हात दाखवला म्हणजे त्याने काँग्रेसला मतदान केल्याचा तर्क-वितर्क नेटकरी लावत आहेत.

बॉलीवूडच्या इतर कलाकारांबद्दल बोलायचे तर, गोविंदा, हेमा मालिनी, ईशा देओल, रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी, गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा, जॉन अब्राहम, अली अझर, रोहित शेट्टी, शाहरुख खानसह त्यांचे संपूर्ण कुटुंब, सलमान खानचे वडील सलीम खान अशा इतर अनेक कलाकारांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कुमारनेदेखील मतदान केले. मतदान करून परत येतानाचा त्याचा एका ज्येष्ठ व्यक्तीबरोबर झालेला संवाद चर्चेचा विषय ठरला. त्या व्यक्तीने अक्षय कुमारजवळ त्याने बांधून दिलेले सार्वजनिक स्वच्छतागृह खराब झाल्याची तक्रार केली. याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. ते मतदानासाठी आले तेव्हा काठी टेकत आल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले.

हेही वाचा: मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; केळवणाचे फोटो आले समोर

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तो सतत कडक सुरक्षेत असल्याचे पाहायला मिळते. सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे तर तो लवकरच ‘सिंकदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan shows his hand instead of inked finger after voting video viral nsp