नॅशनल क्रश रश्मिका मंदानानं तिच्या अभिनय, तसेच लूक्समुळे चाहत्यांना भुरळ पाडली आहे. आता ही साउथ स्टार लवकरच बॉलीवूडचा भाईजान सलमान खानबरोबर आगामी चित्रपटात झळकणार आहे. २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गुड बाय’ चित्रपटाद्वारे रश्मिकाने बॉलीवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गुड बाय’ चित्रपटानंतर रश्मिका संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरबरोबर झळकली. २०२३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं जगभरात ९१७.८२ कोटींची कमाई केली. आता रश्मिका मंदाना पुन्हा एकदा बॉलीवूड चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा… “बुरी नजरवाले…”, आलिया भट्टने कानामागे लावला काजळाचा टिका; अभिनेत्रीचा मेट गालातील ‘तो’ फोटो व्हायरल

सलमान खानच्या बहुप्रतीक्षित आगामी चित्रपटात म्हणजेच ‘सिकंदर’मध्ये रश्मिका झळकणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा रश्मिकानं आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. प्रख्यात दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास आणि सलमान या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

हेही वाचा… “तुमचं वय काय, तुम्ही करताय काय?”, ऐश्वर्या नारकरांनी ‘त्या’ व्हिडीओवर केलेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “बोलण्यात ताकद…”

रश्मिकाचे चाहते तिच्या नव्या चित्रपटासाठी उत्सुक होते. ते लक्षात घेऊन, रश्मिकानं खास तिच्या चाहत्यांसाठी या आगामी चित्रपटाची घोषणा केली. रश्मिकानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबत पोस्ट शेअर केली आणि लिहिलं, “तुम्ही सगळे मला माझ्या आगामी चित्रपटाबद्दल विचारत होता. त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी ‘सिंकदर’ या चित्रपटाचा भाग आहे आणि त्यामुळे मी खूप कृतज्ञ आहे. हा सिनेमा २०२५ मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.”

‘सिकंदर’च्या शूटिंगची सुरुवात मे महिन्यात सुरू होणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण भारत आणि युरोपमध्ये होणार आहे. चित्रपटाच्या बजेटबद्दल जरी अजूनही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अंदाजे या चित्रपटाचं बजेट ४०० कोटी इतकं असेल. त्याशिवाय या चित्रपटानं २०२५ च्या ईदच्या रिलीज स्लॉटमध्ये आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे. चाहते सलमान खान आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा… रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याने सोशल मीडियावरून लग्नाचे फोटो डीलीट केल्यामुळे चर्चांना उधाण

दरम्यान, रश्मिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘सिकंदर’ वगळता अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा ‘पुष्पा-२ ‘ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. रश्मिकाचं ‘छावा’ या हिंदी चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. त्यात विकी कौशलबरोबर ही अभिनेत्री झळकणार आहे. ‘द गर्लफ्रेंड’ हा तेलुगू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या एक दिवसानंतर ही साउथ स्टार धनुषबरोबर शूटिंगला सुरुवात करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan sikandar movie announced by co star rashmika mandanna dvr