Salman Khan Sikandar Movie Review : सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपट आज ( ३० मार्च ) ईदच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ए. आर. मुरुगादोस यांनी केलं असून, यामध्ये सलमान खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची फ्रेश जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकली आहे. ईदच्या लागोपाठ सुट्ट्या असल्याने या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष आहे. तर, सलमानच्या चाहत्यांनी सकाळपासूनच चित्रपटाच्या शोला गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

‘सिकंदर’ सिनेमाचा ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ ज्यांनी पाहिलाय, त्यांनी या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली आहे. ‘सिकंदर’ सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटला जाणून घेऊयात…

सलमानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाबद्दल ‘एक्स’वर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने एक्स पोस्ट शेअर करत लिहिलंय, “सिंकदर सिनेमाच्या कथेला ना हृदय आहे, ना डोळे आहेत. या काही दिवसांत पाहिलेला हा सर्वात वाईट चित्रपट आहे… हा सिनेमा इतका वाईट असेल मला वाटलं नव्हतं.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, “सिंकदरचा पहिला भाग वाईट आहे, दुसरा भाग म्हणजेच मध्यातरांनंतर सिनेमा बरा आहे.” आणखी काही युजरने, “सगळे थिएटर्स रिकामी आहेत… कथेचा काहीच संबंध नाही… एकदम वाईट चित्रपट आहे.”, “विशेषत: बॅकग्राऊंड गाणी पण वाईट आहेत, पहिला भाग स्लो आहे…पटकथा नीट लिहिलेली नाही, भावनिक सीन्स खरंच वाईट सादर करण्यात आले आहेत.”

Sikandar Movie Review
Sikandar Movie Review

तर, याउलट सलमान खानच्या चाहत्यांनी ‘सिकंदर’ सिनेमावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सलमानच्या एन्ट्रीला अंगावर काटा येतो”, “भाईचा चित्रपट नेहमीच सर्वांचं मनोरंजन करतो”, “चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर होईल…लव्ह यू भाईजान” अशा प्रतिक्रिया देखील काही प्रेक्षकांकडून आल्या आहेत.

Sikandar Movie Review
Sikandar Movie Review
Sikandar Movie Review
Sikandar Movie Review

दरम्यान, ‘टायगर ३’नंतर सलमान दीड वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतला आहे. यामुळेच ‘सिकंदर’कडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होती. संपूर्ण भारतात ‘सिंकदर’चे ८ हजार शो आहेत. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.