मराठी कलाविश्वाती लाडका अभिनेता रितेश देशमुखचा लेक राहिलचा काल(१ जून) वाढदिवस होता. रितेश व जिनिलीया दोघांनीही लाडक्या लेकाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशनही करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रितेश देशमुखच्या लेकाच्या वाढिदवसासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानने छोटीशी पार्टी आयोजित केली होती. अर्पिताने राहिलसाठी खास फुटबॉल केक ऑर्डर केला होता. रितेशने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर करत राहिलच्या बर्थडे पार्टीची झलक दाखविली आहे.

हेही वाचा>> Video : ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने हाती घेतलं बसचं स्टेअरिंग, प्रशांत दामले म्हणाले…

रितेशने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन राहिलच्या बर्थडे पार्टीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. लेकाचा बर्थडे एवढ्या खास पद्धतीने सेलिब्रेट केल्याने रितेशने अर्पिताचे आभार मानले आहेत. “राहिलचा बर्थडे साजरा करण्यासाठी अर्पिता मावशीवर विश्वास ठेवणं, हा उत्तम पर्याय आहे,” असं रितेशने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “मानवशिवाय ‘पवित्र रिश्ता’ अपूर्ण आहे”, ‘त्या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचं नाव…”

रितेश देशमुखने २०१२ मध्ये जिनिलीयाशी लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमधील आदर्श कपल म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. त्यांना रियान आणि राहिल ही दोन मुलं आहेत.