बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी चोरी झाली आहे. अर्पिताच्या मुंबईतील घरात १६ मे(मंगळवारी) चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. अर्पिताच्या घरातून तिचे हिऱ्याचे कानातले चोरी झाली आहेत. या कानातल्यांची किंमत सुमारे ५ लाख इतकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अर्पिताच्या घरी काम करणाऱ्या नोकरानेच चोरी केल्याचं समोर आलं आहे. अर्पिताच्या घरी चोरी करणाऱ्या या नोकराचं नाव संदीप हेगडे असून त्याचं वय ३० वर्ष आहे. मुंबईतील विलेपार्ले भागात तो राहण्यास आहे. अर्पिताच्या घरी चोरी करणाऱ्या संदीप हेगडेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

घरात चोरी झाल्यानंतर अर्पिताने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हिऱ्याचे कानातले चोरी झाल्याचं अर्पिताने तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत त्याच रात्री आरोपी संदीप हेगडेला अटक केली.

हेही वाचा>> “पाल जिवंत झाली तर…”, कान्स फेस्टिव्हलमधील लूकमुळे उर्वशी रौतेला ट्रोल, नेटकरी म्हणाले, “ऋषभ पंतचा अपघात…”

दरम्यान, अर्पिता खानने २०१४ साली अभिनेता आयुष शर्माशी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं आहेत. आयुष शर्माने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.