बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून बिग बॉस फेम शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण शहनाजच नाव आलं की अपोआप सिद्धार्थ शुक्लाचं नाव येतच. २०२१ साली सिद्धार्थचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. शहनाज या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सिद्धार्थ आणि शहनाजचे काही चाहते अद्याप सोशल मीडियावर सीडनाज सीडनाजचा जप करताना दिसत आहेत. या चाहत्यांवर सलमान खान चांगलाच भडकला. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- Video : चाहतीबरोबर सेल्फी घेणाऱ्या सलमान खानला बाबा सिद्दीकींनी ओढले; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, “अरे..”

अलीकडेच सलमान खान त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांसह द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला होता. जेव्हा कपिल शहनाजला विचारतो की ती इतकी क्यूट कशी आहे. आपल्या खास शैलीत शहनाज याच उत्तर देत होती. तितक्यात सलमान म्हणाला, ‘सोशल मीडियावर शहनाजला सतत सिडनाज सिडनाज म्हणलं जातं. सिद्धार्थ आता या जगात नाहीए. तो जिथे कुठे असेल त्यालाही असंच वाटत असेल की तिच्या आयुष्यात कोणीतरी यावं, तिचं लग्न व्हावं, मुलंबाळं व्हावीत पण हे सोशल मीडियावर कोणी आहेत जे सिडनाज सिडनाज करत असतात. आता काय आयुष्यभर ही अविवाहितच राहिल का? आणि हे जितके लोक सिडनाज सिडनाज करतात त्यातल्या एकाला जरी हिने पसंत केले तर तो लगेच म्हणेल हो मी तुझ्यासाठी आहे..

सलमान पुढे म्हणतो, ‘लोकांचं ऐकून नको मनाला पटतंय ते कर. आणि आयुष्यात पुढे जा’. सलमान खानने हा सल्ला दिल्यानंतर शहनाज खूप भावूक झाली होती. शहनाजला आजही सिद्धार्थच्या आठवण येते. मात्र आता ती स्वत:ला कामात व्यस्त ठेवताना दिसत आहे.

हेही वाचा- “आम्ही एकमेकांच्या…” सारा अली खान आणि जान्हवी कपूरबरोबर शत्रुत्वाच्या चर्चांवर अनन्या पांडे स्पष्टच बोलली

‘किसी का भाई किसी की जान’ २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. हा चित्रपट वीरम या सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली दिसणार आहेत.

Story img Loader