बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अक्षय कुमार एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. दोघंही अनेकदा एकमेकांचं कौतुकही करताना दिसतात. पण नुकताच सलमान खानने अक्षय कुमारचा असा एक व्हिडीओ पाहिला ज्यानंतर तो खूपच भावूक झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमान खानने सोशल मीडियावर अक्षय कुमारसाठी एक खास मेसेज लिहिला आहे. अर्थात अक्षय कुमारचा हा जुना व्हिडीओ आहे.
काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारने ‘सुपरस्टार सिंगर २’ या रिअलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी स्पर्धकांनी अक्षय कुमारसमोर ‘फुलो का तारो का सबका केहना है… ” हे गाणं सादर केलं. त्यासोबत अक्षय कुमार आणि त्याच्या बहिणीचे फोटो, व्हिडीओ दाखवण्यात आले. हे सर्व पाहून अक्षय कुमारच्या डोळ्यात पाणी आले. यासोबतच अक्षय कुमारची बहिण अल्का भाटियाचा व्हिडीओ मेसेज दाखवण्यात आला. ज्यामुळे अक्षय कुमार बालपणीच्या सर्व आठवणीत फारच भावूक झाला.
आणखी वाचा- स्वतःचे चित्रपट फ्लॉप होत असतानाच अक्षय कुमारला हॉलिवूडची भुरळ, ‘अवतार २’चं कौतुक करत म्हणाला…
यावेळी त्याची बहिण अल्काने व्हिडीओद्वारे अक्षय कुमारचे विशेष आभार मानले. अक्षय कुमारने प्रत्येक कठीण प्रसंगात तिची साथ दिल्याबद्दल तिने त्याचे कौतुकही केले. तसेच एक भाऊ म्हणून त्याने मला कायमच साथ दिली. पण त्यासोबत प्रसंगी तो माझे वडील आणि मित्र दोन्हीही झाला, असेही त्या म्हणाल्या. अक्षयचा हा व्हिडीओ सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरी शेअर केला आहे. त्यांने अक्षयसाठी खास मेसेज लिहिला आहे.
आणखी वाचा-“अभिनेत्रींचे कपडे पाहून वेळ मिळाला तर…” स्वरा भास्करचा भाजपा मंत्र्याला टोला
अक्षय कुमारचा व्हिडीओ शेअर करताना सलमान खानने लिहिलं, “मी आता असा एक व्हिडीओ पाहिला जो मला सर्वांबरोबर शेअर करायचा आहे. अक्की देवाचे आशीर्वाद तुझ्यावर कायमच असतील. तू कमाल आहेस. हा व्हिडीओ पाहून मला खूप भारी वाटलं. कायम फिट राहा, नेहमीच काम करत राहा. देव कायम तुझ्याबरोबर असेल.”

दरम्यान सलमान खान आणि अक्षय कुमार यांना ‘मुझसे शादी करोगी’, ‘जानेमन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेकदा अक्षयने सलमान खानच्या ‘बिग बॉस’ शोमध्ये पाहुणा म्हणून हजेरी लावली आहे. अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं तर तो ‘सेल्फी’, ‘बड़े मियां छोटे मियां’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर सलमान खान आगामी काळात ‘टाइगर ३’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.