सध्या बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांचा ‘जवान’ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. बरेच रेकॉर्ड मोडून नवनवीन रेकॉर्ड या चित्रपटाने निर्माण केले आहेत. अशातच आता सलमान खान देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून ‘टायगर ३’च्या टीझरबद्दल जबरदस्त चर्चा होती. नुकतंच यश चोप्रा यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने यश राज फिल्म्सनी त्यांच्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पुढचा चित्रपट ‘टायगर ३’चा प्रोमो प्रदर्शित केला. या प्रोमोमध्ये ‘टायगरचा मेसेज’ आपल्याला पाहायला मिळाला अन् याबरोबरच सलमानचा एक जबरदस्त अंदाजही पाहायला मिळाला.

आणखी वाचा : ड्रग्स प्रकरण, टॉपलेस फोटोशूट, वादग्रस्त वक्तव्य अन्…९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीची Bigg Boss 17 मध्ये एंट्री?

या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तेव्हापासूनच याच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता अखेर प्रतीक्षा संपली आहे. नुकतंच ‘यश राज फिल्म्स’नी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘टायगर ३’चं एक नवं पोस्टर शेयर करत चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टरमध्ये सलमानचा हातात बंदूक घेऊन सावधपणे उभा असलेल्या लुकमधला फोटो पाहायला मिळत आहे.

या पोस्टमध्ये चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या १६ ऑक्टोबरला ‘टायगर ३’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानचे चाहते यांनी आत्तापासूनच काऊंटडाउन सुरू केलं आहे. अद्याप सलमान आणि कतरिना यांचाच ‘टायगर ३’मधील लुक समोर आला आहे. अद्याप चित्रपटातील मुख्य व्हिलन इम्रान हाशमीच्या लुकची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत.

‘टायगर ३’ हा ‘एक था टायगर’ सीरिजमधील तिसरा भाग आहे. याचा सीक्वल म्हणजेच ‘टायगर जिंदा है’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘टायगर ३’ आता यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा भाग झाला आहे. येत्या दिवाळीत म्हणजे १० नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan starrer tiger 3 trailer date announced yash raj shares a new poster avn